Muncipal Election 2022: महापालिका निवडणूक होणार बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने

मुंबई तक

• 01:38 PM • 22 Sep 2021

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापालिका निवडणुकींच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याचा आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की, सर्व महापालिका निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडतील. महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा वापर […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापालिका निवडणुकींच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याचा आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की, सर्व महापालिका निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडतील.

हे वाचलं का?

महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा वापर केला जावा असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

जाणून घेऊयात ठाकरे सरकारचा नेमका निर्णय काय?

महापालिकेच्या या निवडणुका मिनी विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. या निवडणुकांमध्ये कसा कल मिळतो यावरुन महाराष्ट्रातील राजकारण ठरणार आहे.

मुंबई महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग असणार आहे. म्हणजे एका प्रभागातून तीन सदस्य निवडून येणार आहे. तोच निर्णय नगरपालिका आणि नगरपरिषदा यांच्यासाठी 2 सदस्यीय प्रभाग असणार आहे. तर नगर पंचायतीसाठी 1 सदस्यीय प्रभाग असणार आहे.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती म्हणजे काय?

1 सदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदार एकाच उमेदवाराला मत देता येणार आहे. पण मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये मतदार तीन उमेदवारांना मतदान करु शकतात. तसंच नगरपालिका आणि नगरपरिषदा यासाठी दोन उमेदवारांना मतदान करु शकतात. तर नगरपंचायतीमध्ये मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येईल.

हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. मुळात भाजपने सुरुवातील 2017 साली अशाप्रकारची प्रभाग पद्धती आणली होती. पण त्यावेळी प्रत्येक महापालिकेत वेगवेगळ्या स्वरुपाची रचना होती. पण याबाबत महाविकास आघाडीने आता सुसुत्रता आणणं गरजेचं आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार यापुढे मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. तर उर्वरित महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभा रचना असणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूरसह काही महापालिकेत दोन सदस्यीय प्रभाग पद्धत राहावी अशीच काही नेत्यांची मागणी होती. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळात यासंबंधीचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग पद्धत आणि उर्वरित महापालिकेत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे. याचसोबत नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये 2 सदस्यीय पद्धत असणार आहे. तर नगरपंचायत निवडणूकमध्ये 1 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने निवडणूक आयोगाला महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. कोरोना संर्सगामुळे राज्यातील बऱ्याच महापालिकेच्या निवडणुका या होऊ शकलेल्या नाहीत. अशाच मुदत संपलेल्या आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुदत संपणाऱ्या महापालिकांची निवडणूक आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडणार आहे.

    follow whatsapp