महिंद्राने मिळवला मोठा सन्मान, SUV ठरली देशातील सर्वात सुरक्षित कार

मुंबई तक

• 12:25 PM • 11 Nov 2021

भारतीय कार उत्पादक कंपनी महिंद्राने आपली एसयुव्ही महिंद्रा एक्सयुव्ही 700 (SUV Mahindra XUV 700) लॉन्च केली होती. लाँचिंगपूर्वी आणि नंतरही या कारची बरीच चर्चा रंगली होती, आता पुन्हा एकदा ही कार चर्चेचा विषय ठरली आहे. ग्लोबल एनसीएपीने (Global NCAP) या कारची क्रॅश चाचणी केली होती. त्या चाचणीमध्ये SUV ने 5 स्टार कमवले आहेत. क्रॅश चाचणीमध्ये […]

Mumbaitak
follow google news

भारतीय कार उत्पादक कंपनी महिंद्राने आपली एसयुव्ही महिंद्रा एक्सयुव्ही 700 (SUV Mahindra XUV 700) लॉन्च केली होती. लाँचिंगपूर्वी आणि नंतरही या कारची बरीच चर्चा रंगली होती, आता पुन्हा एकदा ही कार चर्चेचा विषय ठरली आहे. ग्लोबल एनसीएपीने (Global NCAP) या कारची क्रॅश चाचणी केली होती. त्या चाचणीमध्ये SUV ने 5 स्टार कमवले आहेत.

हे वाचलं का?

क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार

या कारने आतापर्यंतचा हाइएस्ट कंबाइंड सेफ्टी स्कोर मिळवला आहे. या चाचणीमध्ये कारला 66.00 पैकी 57.69 गुण मिळाले असून ही कार भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरली आहे. सुरक्षा चाचणीत 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळवणारी ही कार भारतातील पहिली 7 सीटर पूर्ण आकाराची SUV बनली आहे. स्कोअरमुळे या कारच्या विक्रीत काही प्रमाणात वाढ झाल्याचं कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

कारमध्ये काय आहे?

आता कारमध्ये कोणत्या सुविधा आहेत, यावरही एक नजर टाकुया. कारमध्ये 10 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. हे Apple CarPlay आणि Android Auto सारख्या सिस्टिमला कनेक्ट होते. या कारमध्ये टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचा पर्याय आहे. हे दोन्ही इंजिन स्वयंचलित आणि मॅन्युअल गिअरबॉक्स पर्यायांसह आहेत. जेणेकरून ग्राहक त्यांच्या गरजेनुसार व्हेरियंट निवडू शकतात.

कशी आहे महिंद्रा XUV700 SUV?

Mahindra XUV700 SUV कारला क्रोम स्लेटसह काळी ग्रिल आणि पुढच्या बाजूला नवीन लोगो आहे. यात एलईडी डीआरएलसह नवीन एलईडी हेडलॅम्प, मोठ्या ट्विन सी-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आहेत. याला नवीन फ्लश-फिटिंग डोअर हँडल, इलेक्ट्रिक-पॉवर ORVM सह टर्न सिग्नल आणि फ्लेर्ड व्हील आर्क्स आहेत. कारच्या मागील बाजूस स्टायलिश रॅपराऊंड एलईडी टेललॅम्पसह टेलगेट आहे.

    follow whatsapp