अरे देवा! कुत्रा चावलेल्या व्यक्तीला रेबीज ऐवजी दिली कोरोनाची लस

मुंबई तक

• 11:27 AM • 01 Nov 2021

दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली नाही, तर काय होऊ शकतं याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. कुत्रा चावलेल्या एका व्यक्तीला आरोग्य कर्मचाऱ्याने रेबीज ऐवजी चक्क कोरोनाची लस दिली. झारखंडमधील पलामू जिल्ह्यात ही घटना घडली आहे. झालं असं की, झारखंडमध्ये पलामू जिल्ह्यातील नौहिडा गावात एका व्यक्तीला कुत्र्याने दंश केला. कुत्रा चावल्यानंतर ती व्यक्ती पाटण […]

Mumbaitak
follow google news

दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली नाही, तर काय होऊ शकतं याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. कुत्रा चावलेल्या एका व्यक्तीला आरोग्य कर्मचाऱ्याने रेबीज ऐवजी चक्क कोरोनाची लस दिली. झारखंडमधील पलामू जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

हे वाचलं का?

झालं असं की, झारखंडमध्ये पलामू जिल्ह्यातील नौहिडा गावात एका व्यक्तीला कुत्र्याने दंश केला. कुत्रा चावल्यानंतर ती व्यक्ती पाटण येथील आरोग्य केंद्रात गेले होते. तिथे त्या व्यक्तीला कोरोनाचीच लस देण्यात आली.

याविषयी आरोग्य अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, 50 वर्षीय राजू यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. ते कुत्रा चावल्यामुळे रेबीजची लस घेण्यासाठी आले होते. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना पुन्हा कोरोनाची लस दिली गेली.

पाटण आरोग्य केंद्रात घडलेल्या या प्रकाराबद्दल पलामूचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कुमार म्हणाले, ‘निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी डॉ. एमपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणला जाईल.’

Corona प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या महिलेला दिलं रेबीजचं इंजेक्शन, ठाण्यातला धक्कादायक प्रकार

आतापर्यंत लस घेतलेल्या व्यक्तीची तब्येत चांगली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल. संबंधित कर्मचाऱ्यावर नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असं अनिल कुमार म्हणाले.

    follow whatsapp