पुणे: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांना आला होता. त्यानंतर मंत्रालयाची कसून तपासणी केली असता, ती अफवा निघाल्याचे स्पष्ट झाले. त्या गोष्टीला काही दिवस होत नाही. तोवर मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई मेल गृह विभागाला पुण्यातील एका व्यक्तीने केल्याने एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
शैलेंद्र शिंदे असे मेल करणार्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई मेल बी. टी. कवडे रोड परिसरात रहाणार्या शैलेंद्र शिंदे या व्यक्तीने केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार संबधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. शैलेंद्र याने मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नसल्याने असा प्रकार केल्याचे आरोपीने सांगितले.
अशी माहिती मुंढवा पोलिसांनी सांगितली असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, पोलीस यंत्रणा हायअलर्टवर
‘जमिनीचे पैसे मिळत नसल्यामुळे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन’
दरम्यान, 30 मे रोजी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाला एका निनावी फोनवरुन मंत्रालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. पण हा फोन कॉल अफवा पसरवण्यासाठी केला असावा असा मुंबई पोलिसांनी अंदाज बांधला होता. तपासाअंती धमकीचा फोन नागपूरवरुन आल्याचं निष्पन्न झालं होतं.
यावेळी नागपूर एटीएस आणि ग्रामीण पोलिसांना याबद्दल तात्काळ माहिती देण्यात आली होती. यानंतर दोन तासांनी पोलिसांनी उमरेड भागातून सागर मेंदरे या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं होतं.
YouTube व्हीडिओ पाहून तरूणाने तयार केला बॉम्ब, निकामी करण्यासाठी घेतली पोलीस ठाण्यात धाव
चौकशीदरम्यान सागरने आपणच हा फोन केल्याचं मान्य केलं होतं. सागर मेंदरची जमीन काही वर्षांपूर्वी अधिग्रहणात गेली परंतू या जमिनीचा मोबदला अद्याप त्याला मिळाला नाही. यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण हा फोन केल्याचं सागरने सांगितलं होतं.
1997 पासून सागर मेंदरे आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी पत्रव्यवहार करत आहेत. अद्याप त्याला त्यात यश आलं नाही. सागरला हाडाचं दुखण असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. त्यातच जमिनीचा मोबदला मिळत नसल्यामुळे सागर चिंतेत होता. म्हणून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं होतं. दरम्यान, नागपूर एटीएसने सागर मेंदरेला उमरेड पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.
ADVERTISEMENT