Man catwalk inside mumbai local : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video viral) होत असतात. काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरूण स्कर्टमध्ये मुंबईच्या लोकलमध्ये (mumbai local) कॅटवॉक (catwalk) करताना दिसला आहे. तरूणाच्या या कॅटवॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.(man doing catwalk wearing a skirt in mumbai local passengers are shocked video viral social media)
ADVERTISEMENT
मुंबई लोकलं (mumbai local) म्हटलं तर प्रवाशांची गर्दी डोळ्यासमोर येते. या गर्दीसोबत एकमेकांना धक्का मारून लोकलच्या आत शिरणारी माणसेही समोर येतात. या लोकलमध्ये माणसांना पाय ठेवायला जागा नसते,इतकी गर्दी असते. मात्र भरगच्च लोकलमध्ये एका तरूणाने चक्क स्कर्ट घालून कॅटवॉक (catwalk)केला आहे. त्याचा हा कॅटवॉक पाहून प्रवाशी थक्क झाले होते.या लोकलमधील कॅटवॉकचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
बातम्या वाचता वाचता महिला अँकर जमिनीवर कोसळली, थरकाप उडवणारा Video व्हायरल
व्हायरल व्हिडिओत काय?
एका तरूणाने मुंबईच्या लोकलमध्ये स्कर्टवर कॅटवॉक (catwalk)केला आहे. व्हिडिओच्या सूरूवातीला हा तरूण लोकलच्या मधल्या रांगेत वेगाने चालत जात कॅटवॉक करतो. त्याचा हा कॅटवॉक पाहून सर्वेच अवाक होतात. या तरूणाने काळ्या कलरचा कुर्ता आणि खाली त्याच रंगाचा स्कर्ट घातलाय. या तरूणाची केस तरूणींसारखी लांबसडक आहेत. तसेच या लुकमध्ये त्याने काळ्या रंगाचा गॉगल देखील घातला आहे. या आऊटफिटमध्ये तो लोकलमध्ये चढून प्रवाशांमध्ये कॅटवॉक (catwalk)करतो. हा कॅटवॉक झाल्यानंतर प्रवाशांच्या रिअॅक्शन या व्हिडिओत दाखवण्यात आला आहे.सध्या लोकलमधील तरूणाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं
द गाय इन स्कर्ट नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत काका तोंड तरी बंद करा, असे कॅप्शन लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 18 हजार व्युज आले आहेत. तसेच कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. 25 फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ शेअऱ करण्यात आला होता.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
दुबईत ब्रेनवॉश, जॉर्जियात ट्रेनिंग… अमृतपाल सिंग असा झाला ISI चा बाहुला
शिवम भारद्वाज नावाच्या व्यक्तीचे द गाय इन स्कर्ट हे इन्टाग्राम अकाऊंट आहे. शिवम हा एक फॅशन ब़्लॉगर आहे. तसेच अनेक मेकअपचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. याधी त्याने लुंगीमध्ये लोकलमध्ये डान्स देखील केला होता. हा व्हिडिओ देखील त्याचा सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता. सध्या शिवमचा मुंबई लोकलमधील स्कर्टमधील कॅटवॉक (catwalk)चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT