पहिलं लग्न झालेलं असतानाही त्याबद्दल माहिती लपवून ठेवल्यामुळे नाराज असलेल्या युवकाने आपल्या पत्नी आणि सासरच्या व्यक्तींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बोरीपार्धी येथे ही घटना घडली आहे. प्रशांत शेळके असं या तरुणाचं नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी स्वतःचा व्हिडीओ बनवला होता. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत शेळकेचं २०२१ मध्ये भाग्यश्री पिसे या तरुणीसोबत लग्न झालं होतं. लग्नाचे पहिले काही महिने सुरळीत गेल्यानंतर आपल्या पत्नीचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्या लग्नातून तिला एक मुलही असल्याचं प्रशांतला समजलं. यानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायाल लागले.
एसटी बस आणि बुलेटचा भीषण अपघात, तीन जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू
हा वाद मिटवण्यासाठी भाग्यश्रीच्या घरातील सदस्यांनी तीस लाखांची मागणी केल्याचा आरोप प्रशांतच्या नातेवाईकांनी केला आहे. या वादाला कंटाळून प्रशांतने १४ फेब्रुवारीला विषारी औषध घेतलं. यानंतर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतू अखेरीस त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. प्रशांतने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांनी त्याची पत्नी भाग्यश्री पिसे, सासू स्वाती पिसे, सासरे दत्तात्रेय पिसे आणि प्रदीप नेवसे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Crime: कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांचा खून
ADVERTISEMENT