उल्हासनगरमधील अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील फार्व्हर लाईन चौकात एकाची नातेवाईकांनीच भरदिवसा हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, याप्रकरणी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
नातेवाईकांनीच ही हत्या केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तीन हल्लेखोर नातेवाईकांवर हत्येचा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही हल्लेखोर फरार झाले असून, मनवीर मरोठिया असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रामपाल करोतीया आणि राखी करोतिया असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
Video : पुण्यात कपलने हद्दच पार केली…भररस्त्यात वाहतूक थांबवून रोमान्स
मिळालेल्या माहितीनुसार मयत मनवीर मरोठिया हे उल्हासनगर शहरातील फार्व्हर लाईन भागात असलेल्या इमली पाडा परिसरात कुटुंबासह राहत होते. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून मृत मनवीर आणि त्यांच्या मरोठिया कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होते.
याच वादातून त्यांच्यात अनेकदा जोरदार भांडणही झाली आहेत, परंतु आज सकाळच्या सुमारास कामावर जात असतानाच आधीच घात लावून बसललेल्या तीन हल्लेखोर नातेवाईकांनी फार्व्हर लाईन चौकात मनवीर यांना गाठून त्यांच्यावर तलवार आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला.
मनवीर सोबतच कामावर जाणारे रामपाल करोतिया, राखी करोतिया यांच्यावरही हल्लेखारांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मनवीर यांच्याबर तलवारीने गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरातील हिंसा राजकीय की धार्मिक? काय आहे थेअरी?
संपत्तीच्या वादात मध्यस्थी करणारे रामपाल आणि राखी करोतीया यांच्यावर हल्ला झाल्याने जखमी झाले आहेत.
कधी आणि कसा केला हल्ला?
तीन हल्लेखोरांनी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडके आणि तलवारीने हल्ला करत हत्या केली. भर चौकात झालेल्या हत्याच्या थराराने शहरात एकच खळबळ उडाली. सध्या जखमी पती व पत्नीवर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला आहे. दरम्यान तीन हल्लेखोर हे फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि मध्यवर्ती पोलीस रवाना झाले आहेत. लवकरच आरोपीना अटक केली जाईल असं मधुकर कड यांनी सांगितले.
ADVERTISEMENT