Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

मुंबई तक

17 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:09 PM)

crime news in marathi: 45 दिवसांपूर्वी जन्माला आलेल्या मुलाचा घरात आनंद असतानाच वादामध्ये पतीसोबत केलेली मस्करी महागात पडली आणि कुटुंबच उद्ध्वस्त झालं. हैदराबादमधील अब्दुल्लापुरममध्ये ही घटना घडलीये. पत्नीकडून होत असलेल्या चिथावणीजनक विधानानंतर संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीने पत्नीचे तुकडे केले. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने दीड महिन्याच्या बाळालाही संपवलं. (husband killed wife and son) हैदराबादमधील अब्दुल्लापुरम […]

Mumbaitak
follow google news

crime news in marathi: 45 दिवसांपूर्वी जन्माला आलेल्या मुलाचा घरात आनंद असतानाच वादामध्ये पतीसोबत केलेली मस्करी महागात पडली आणि कुटुंबच उद्ध्वस्त झालं. हैदराबादमधील अब्दुल्लापुरममध्ये ही घटना घडलीये. पत्नीकडून होत असलेल्या चिथावणीजनक विधानानंतर संतापलेल्या पतीने कुऱ्हाडीने पत्नीचे तुकडे केले. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने दीड महिन्याच्या बाळालाही संपवलं. (husband killed wife and son)

हे वाचलं का?

हैदराबादमधील अब्दुल्लापुरम ही थरकाप उडवणारी घटना घडली. पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्यानंतर मुलाला पाण्यात बुडवून मारलं. ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

पत्नीसह नवजात बाळाची हत्या, पतीने का केलं क्रूर कृत्ये?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये आधी भांडण झालं आणि नंतर हाणामारी. पती धनराजने आधी पत्नी लावण्यावर बिअर बॉटलने हल्ला केला. त्यानंतर कुऱ्हाडीने वार केले. हे हत्याकांड दुपारी 1.30 वाजता घडलं. आरोपी धनराज हत्या करून फरार झाला, मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत लगेच त्याला अटक केली. त्याच्याजवळ रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना मिळाले.

Crime : सोशल मिडीयावर मैत्री, दारु पाजून बलात्कार, अन् धर्मांतर करुन लग्न…

पोलिसांनी सांगितलं की, या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. पती-पत्नी मजुरी करायचे आणि मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसलं होतं. ज्यादिवशी घटना घडली त्यादिवशी या दाम्पत्याच्या मोठ्या मुलीने आईला मारहाण करताना बघितलं. त्यानंतर ती मदतीसाठी आरडाओरड करू लागली. जेव्हा आजूबाजूचे लोक गोळा झाले, तोपर्यंत धनराज घरातून फरार झाला होता.

husband killed wife in pieces : पती-पत्नीमधील वाद का टोकाला गेले?

मयत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं की धनराजने तिच्यावर यापूर्वी हल्ला केला होता, मात्र तो तिची हत्या करेल याची कल्पना कुणाला आली नाही. तो पत्नीला हुंड्यासाठीही त्रास देत होता, असंही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं.

मुंबई शहारली! बॉयफ्रेंडसाठी आईचे केले तुकडे, पोलिसांनी असा लावला छडा

पोलिसांनी मयत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीलाही अटक केली आहे. आरोपीविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपासून धनराजची पत्नी माहेरी होती आणि परत सासरला येत नव्हती. तिने अलिकडेच एका बाळाला जन्म दिला. धनराज पत्नीवर नाराज होता कारण पत्नीने त्याला सांगितलं की झालेल्या मुलाचा बाप तो नाहीये. धनराजचं मुलाचा खरा बाप आहे, हे तिला माहिती होतं, पण ती चिडवण्यासाठी त्याला सतत टोमणे मारत होती.त्यामुळे रागात येऊन त्याने तिला कुऱ्हाडीचे घाव करत संपवलं आणि मुलाला पाण्यात बुडवून मारलं.

    follow whatsapp