मंदिरात दर्शन घेऊन येतो म्हणून घराबाहेर पडला, दोन दिवसांनी थेट मृतदेहच सापडला – बीडमधली घटना

मुंबई तक

• 09:08 AM • 11 Mar 2022

बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील चिचखंडी येथे राहणारे ४८ वर्षीय बाबुराव गडदे यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. मंदिरात जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडलेले बाबुराव गडदे घरी परतलेच नाहीत. यानंतर त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. […]

Mumbaitak
follow google news

बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील चिचखंडी येथे राहणारे ४८ वर्षीय बाबुराव गडदे यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. मंदिरात जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडलेले बाबुराव गडदे घरी परतलेच नाहीत. यानंतर त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी मौजे चिचखंडी येथील बाबुराव गावाबाहेरील देवीच्या मंदिरात दर्शानासाठी जाऊन येतो असं सांगून घराबाहेर पडले. परंतू दुपारचे चार वाजल्यानंतरही बाबुराव घरी आले नाहीत म्हणून घरच्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी गडदेवाडी शिवारापासून काही मिटर अंतरावर असलेल्या नदीपात्रात त्यांचा मृतदेह सापडून आला.

कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने बाबुराव यांची डोक्यात दगड घालून हत्या केली होती. काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथे लातूरच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या अंतरात खुनाच्या दोन घटना समोर आल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मयत बाबुराव यांना पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. बाबुराव यांचा एक मुलगा लिंबा कारखान्यात उसतोडणीच्या कामासाठी गेला असून दुसरा मुलगा शिक्षण घेतो आहे.

या घटनेमुळे बाबुराव यांचा परिवार उघड्यावर पडला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आंबा घाटात भीषण अपघात; ४०० फूट खोल दरीत कोसळली गाडी

    follow whatsapp