कोल्हापूर : तंबाखू खाण्याची तलफ पडली महागात, हमालाची दीड लाखाची रक्कम चोरट्याने पळवली

मुंबई तक

• 12:38 PM • 02 Nov 2021

आयुष्यात अनेकदा बेसावध राहिल्याचा फटका आपल्यापैकी प्रत्येकाला बसला आहे. कोल्हापूरमध्ये हमालीचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला तंबाखू खाण्याची तलफ दीड लाखाला पडली आहे. संधी साधून बँकेच्या बाहेर चोरट्यानी दीड लाखाची रक्कम लंपास केली आहे. सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला असून पोलीस या आधारावर गुन्ह्याचा तपास करत आहेत. दुपारी बारा वाजल्याच्या दरम्यान कोल्हापूरच्या प्रसिद्ध दसरा चौकात […]

Mumbaitak
follow google news

आयुष्यात अनेकदा बेसावध राहिल्याचा फटका आपल्यापैकी प्रत्येकाला बसला आहे. कोल्हापूरमध्ये हमालीचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला तंबाखू खाण्याची तलफ दीड लाखाला पडली आहे. संधी साधून बँकेच्या बाहेर चोरट्यानी दीड लाखाची रक्कम लंपास केली आहे. सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला असून पोलीस या आधारावर गुन्ह्याचा तपास करत आहेत.

हे वाचलं का?

दुपारी बारा वाजल्याच्या दरम्यान कोल्हापूरच्या प्रसिद्ध दसरा चौकात ही घटना घडली आहे. पांडुरंग भोसले हे मार्केट यार्डात हमालीचं काम करतात. दिवाळीसाठी झालेल्या बोनससह दीड लाख रुपयांची रक्कम भोसले यांनी आज कॅनरा बँकेच्या शाखेतून काढली. ही रक्कम पिशवीत ठेवल्यानंतर पांडुरंग भोसले बँकेबाहेर पडले. याचदरम्यान भोसले यांना तंबाखू खाण्याची तलफ आली आणि त्यांनी हातातली दीड लाखांची रक्कम बँकेच्या बाहेरील कठड्यावर ठेवली.

याचदरम्यान चोरट्याने डाव साधत भोसलेंना आपल्या जाळ्यात अडकवलं. या चोरट्याने भोसलेंच्या जवळ जाऊन, तुमचे पैसे पडले आहेत, असं सांगून लक्ष विचलित केलं. हे पैसे पडलेले माझे नाहीत, असं सांगूनही त्या तरुणानं ते तुमचेच पैसे आहेत, असं सांगून भोसलेंना ते पैसे उचलायला भाग पाडलं. पडलेले पैसे भोसले उचलत असतानाच चोरट्याने डाव साधत कठड्यावर ठेवलेली दीड लाखांची पिशवी लंपास केली. भोसले यांनी आरडाओरड करत चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतू तोपर्यंत त्याने धूम ठोकली होती.

लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. सीसीटीव्ही हा चोरटा कैद झाला असून पोलीस तपास करत आहेत.

रुग्णालयात जाणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तीन नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    follow whatsapp