Viral Video: जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने पायाला घट्ट धरलं, पण तरुणाने गाठला क्रुरतेचा कळस!

मुंबई तक

• 02:36 PM • 08 Sep 2024

Man Throws Dog In Flood Viral Video : पाळीव कुत्र्याला नदीच्या पुरात फेकून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या तरुणाचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Man Throws Dog Into Flood Water Video

Man Throws Dog Into Flood Water Video

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुक्या प्राण्याच्या जीवाशी खेळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल

point

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळं संतापाची लाट

point

पुराच्या पाण्यात फेकलेल्या कुत्र्याचा जीव वाचला का?

Man Throws Dog In Flood Viral Video : पाळीव कुत्र्याला नदीच्या पुरात फेकून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या तरुणाचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणाने कुत्र्याला निर्दयीपणे पाण्यात फेकलं आणि त्याचा व्हिडीओ बनवला. कुत्र्याने पुराच्या पाण्यातून बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कुत्र्याने तरुणाच्या पायाला धरलं, जीव वाचवण्यासाठी या मुक्या प्राण्याने प्रयत्न केला, तरीही या तरुणाने क्रुरतेचा कळस गाठला. या तरुणाने कुत्र्याला पुराच्या पाण्यात फेकल्यानंतर या तरुणाच्या इतर मित्रांनी तो व्हिडीओ कॅमेरात कैद केला. ही धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली असून व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने तरुणाच्या पायाला घट्ट धरण्याचा प्रयत्न केला. पण तरीही या निर्दयी तरुणाने कुत्र्याचा जीवाचा खेळ केला. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात कुत्र्याला फेकल्यानंतर काही तरुणांनी हा व्हिडीओ काढला आणि मुक्या प्राण्याला इजा पोहोचवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी मित्रांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> Sanjay Raut: "लालबागचा राजा गुजरातला नेण्याचा...", अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून राऊत कडाडले

इथे पाहा कुत्र्याचा धक्कादायक व्हिडीओ

एका यूजरने हा व्हिडीओ एक्सवर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कुत्र्याच्या जीवाचा खेळ करणाऱ्यांना सुनावलं आहे. प्राण्यांना क्रुरपणे वागणूक देणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कुत्र्याचा जीव घेणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी एका यूजरने केली आहे. कुत्र्याचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> Mahesh Landage: भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, यामागचं कारण काय?

मुक्या प्राण्यांना क्रुरपणे वागणूक देणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्राणि मित्र संघटनांकडून नेहमीच केली जाते. प्राण्यांवर क्रुरपणे हल्ला झाल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पाळीव प्राण्यांना विनाकारण त्रास देऊन त्यांचा खेळ करणाऱ्यांना जेरबंद केलं पाहिजे, असा सूर सोशल मीडियावर उमटला आहे. 

    follow whatsapp