Manoj Jarange : उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फक्त कागद दाखवून...

"गोर गरीबांना या राज्यात न्याय नाही. फक्त कागद दाखवून लोकांना भावनिक केलं जातं. बीड प्रकरणातील सह आरोपी झाले का?" असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

27 Feb 2025 (अपडेटेड: 27 Feb 2025, 09:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

point

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: दिली होती माहिती

point

मनोज जरांगे म्हणाले, फक्त नियुक्ती करून...

उज्ज्वल निकम यांची बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली ती चांगली गोष्ट आहे. बीड प्रकरणातील सह आरोपी आहेत ते कधी होणार आहे? नुसता भावनिक करून चालणार नाही, सरकारने छुपा अजेंडा मस्साजोग प्रकरणात चालवलाय असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. मागच्या तीन महिन्यात कोणी सह आरोपी झाले का? मागच्या दोन महिन्यापासून निकम साहेबाच्या नियुक्तीची मागणी सुरू आहे, तिला 2 महिने लागत आहेत, शेवटी आंदोलनच करावं लागलं असं म्हणत जरांगेंनी संताप व्यक्त केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Amravati : 22 दिवसांच्या बाळाला लोखंडी सळईने 65 चटके, श्वास घेता येत नव्हता म्हणून अंद्धश्रद्धेतून विचित्र प्रकार

"गोर गरीबांना या राज्यात न्याय नाही. फक्त कागद दाखवून लोकांना भावनिक केलं जातं. बीड प्रकरणातील सह आरोपी झाले का?  पोलीस सह आरोपी झाले का? नाही, खंडणी आणि खून करणाऱ्याला साथ देणारे कोणी सह आरोपी झाले का? तर नाही, गाड्या घेऊन जाणारे  आरोपी झाले का? पैसा पुरवणारे सह आरोपी झाले का? नाही झाले. आळंदीला कोण गेलं होतं? त्यामध्ये कोणी सह आरोपी आहेत का? असे अनेक सवाल मनोज जरांगे यांनी केले आहेत.

हे ही वाचा >>इमॅजिकामध्ये पिकनिकला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

मुख्यमंत्र्यांचं फक्त कागद दाखवून भावनिक करून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा हे साधं काम आहे, पण जे मुख्य प्रश्न आहे, तो सह आरोपी झाले पाहिजे, अंडर ट्रायल केस चालली पाहिजे. सगळे आरोपी आणि सहआरोपी यांच्या प्रॉपर्टीला सील लावलं गेलं पाहिजे. यांची ईडी चौकशी झाली पाहिजे तीही होत नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली.

    follow whatsapp