गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत समाजातील अनेक जण परिस्थितीचं भान ओळखून सण-समारंभ, वाढदिवस साधेपणाने साजरा करत आहेत. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूनेही अनावश्यक खर्च टाळत शाळेतील विद्यार्थ्यांना वाफेच्या मशीनच वाटप केलं आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण पडत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा अशा अनेक गोष्टींमुळे काही दिवसांपूर्वी परिस्थिती गंभीर होती. अशावेळी रिंकूने महाळुग येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन वाफ घेण्याच्या मशीनचं वाटप केलं. ३ जून रोजी रिंकूचा वाढदिवस पार पडला.
एकीकडे अनेक सेलिब्रेटी वाढदिवस पार्ट्यांमधून लाखोंची उधळण करत असताना रिंकू राजगुरूने दाखवलेलं समाजभान हे नक्कीच वाखणण्याजोगं आहे.
ADVERTISEMENT