धक्कादायक ! मराठी कलादिग्दर्शक राजु साप्ते यांची आत्महत्या

मुंबई तक

• 06:19 AM • 03 Jul 2021

मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजु साप्ते यांनी आज आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यात आपल्या घरामध्ये साप्ते यांनी एक व्हिडीओ तयार करत आपण हे पाऊल का उचललं याचं कारण सांगितलं. आपण हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या […]

Mumbaitak
follow google news

मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजु साप्ते यांनी आज आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यात आपल्या घरामध्ये साप्ते यांनी एक व्हिडीओ तयार करत आपण हे पाऊल का उचललं याचं कारण सांगितलं.

हे वाचलं का?

आपण हा व्हिडीओ कोणत्याही नशेमध्ये बनवत नसून मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जातोय. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीयेत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या लेबर लोकांना भडकवत आहे. यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.

माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीयेत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. पण राकेश मौर्या लेबर लोकांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरु करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचं सांगत मला न्याय मिळावा अशी मागणी साप्ते यांनी या व्हिडीओत केली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अद्याप काय कारवाई केली याचे तपशील मिळू शकलेले नाहीत.

    follow whatsapp