छत्रपती शिवरायांच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषेचं तेज तळपलं पाहिजे असं गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा ही स्वभाषाच असावी हे ठणकावून सांगितलं होतं आपलं सरकार तसंच काम करतं आहे. राज्य व्यवहार कोश तयार करण्यची सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.
ADVERTISEMENT
‘भाजपचं हिंदुत्व गाढवाने पांघरलेल्या वाघाच्या कातड्यासारखं’-उद्धव ठाकरे
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन आज होत आहे. याचा मला आनंद होतो आहे. जबाबदाऱ्या पार पाडताना काही जबाबदाऱ्या आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद देणाऱ्या असतात. आजची जबाबदारी माझ्यासाठी अशीच माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद देणारी आहे. मराठी माणूस म्हटलं की संघर्ष आलाच.भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. त्याचे स्मारक ही येथे जवळच आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही.
मुंबईसाठी माझे आजोबा लढले, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले आणि आज मुख्यमंत्री म्हणून माझे नाव या इमारतीच्या भूमिपूजनाच्या पाटीवर लागले यापेक्षा माझ्या जीवनाचे दुसरे सार्थक असूच शकत नाही. देशातीलच नाही तर परदेशातील माणसं ही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसं असावे हे त्याला इथं येऊन कळावे. मातृभाषेचं मंदिर पहायला जगभरातून लोक यावीत. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळलं पाहिजे.
‘…यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती’; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
महाराष्ट्रात मराठी भाषा शाळेत शिकवावी, दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे. मराठी भाषेत बोला, असं म्हटलं की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहिती आहे मला त्यांची काळजी नाही. जास्तीत जास्त भाषा शिकणं गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये
मराठी भाषा भवनाला लागून मराठी रंगभूमी दालन उभे राहात आहे. मराठी रंगभूमीला स्वत:चा वैभवशाली इतिहास आहे. इंग्रजी आली पाहिजे, इतर भाषेचा मी द्वेष करत नाही, पण मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती होती. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT