स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक आगळवेगळं व्यक्तिमत्व होतं. मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की या वेळचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे जयंत नारळीकर आहेत. विज्ञानवादाचा पुरस्कार त्यांनी या साहित्य संमेलनात केला. माझ्या वाचनात जे जुने साहित्यिक आहेत आणि त्यांचं लिखाण ज्यावेळी मी आठवतो त्यावेळी मला सावरकर आठवतात. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते, ते नाही त्या गोष्टींचा पुरस्कार कधीही करत नव्हते. असं आज शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांचं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. तसंच त्यांच्या नावावरून जो वाद झाला तो दुर्दैवी आहे असंही वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यांना विरोध असण्याचं काही कारणच नाही असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT
गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, शरद पवार म्हणतात ही बाब निंदनीय
साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात काय म्हणाले शरद पवार?
वीर सावरकर यांनी भगूरला जन्म घेतला. त्यांनी सुरू केलेल्या क्रांती यज्ञात अनेक क्रांतीकारक सहभागी झाले. याच नाशिकच्या भूमीत अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जुलमी कलेक्टर असलेल्या जॅक्सनला 1909 मध्ये गोळ्या घालून ठार केलं. इंग्रज सरकारला कानठळ्या बसवणाऱा पराक्रम ज्या नाशिकच्या भूमित घडला त्याच भूमित हे साहित्य संमेलन होतंय याचा विशेष आनंद होतो आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. साहित्य संमेलनाचा आज अखेरचा दिवस होता, त्यावेळी शरद पवार यांनी आपले विचार मांडले आहेत.
नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी. साहित्य संमेलन म्हटल्यानंतर अनेक उत्तम साहित्यिकांचं योगदान समजतं. त्यांना समजून घेण्याची संधी मिळते. मात्र अलिकडे साहित्य संमेलन म्हटलं की काही ना काही वाद झालाच पाहिजे असा काही नियम झाला आहे का? पण हे सातत्याने घडतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्याविषयीचं योगदान यासंदर्भातली चर्चाच होऊ शकत नाही. त्यांनी केलेला त्याग यासंबंधीची चर्चाच आपण करू शकत नाही. स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी मांडलेले विचार, त्यांनी केलेलं लिखाण हे अजरामर आहे. मराठी भाषा ते लिखाण कधीही विसरू शकत नाही. कुसुमाग्रजांचं योगदानही मोठं आहे. तरी वाद कशासाठी?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक आगळवेगळं व्यक्तिमत्व होतं. मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की या वेळचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे जयंत नारळीकर आहेत. विज्ञानवादाचा पुरस्कार त्यांनी या साहित्य संमेलनात केला. माझ्या वाचनात जे जुने साहित्यिक आहेत आणि त्यांचं लिखाण ज्यावेळी मी आठवतो त्यावेळी मला सावरकर आठवतात. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते, ते नाही त्या गोष्टींचा पुरस्कार कधीही करत नव्हते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची काही वादग्रस्त विधानं आहेत पण त्यामध्ये विज्ञानावर आधारीत त्यांचा दृष्टीकोन होता. अगदी साधी गोष्ट सांगता येईल की त्यांनी हे सांगितलं होतं की गाय हा उपयुक्त पशू आहे. जोपर्यंत ती उपयुक्त आहे तोपर्यंत तिचा त्या पद्धतीने लाभ घ्या आणि उपयुक्तता संपल्यानंतर दुसऱ्या पद्धतीने लाभ घ्या. हे कुणी सांगितलं तर वीर सावरकरांनी.
Savarkar: सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते, त्यांनी तर…: मोहन भागवत
अनेक गोष्टी सांगता येतील. वीर सावरकारांनी नंतरच्या काळात रत्नागिरीत जाऊन आपलं निवासस्थान त्या ठिकाणी बांधलं. पूजेसाठी त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं. त्या मंदिरात जो पूजा करत होता ती व्यक्ती दलित होती. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वीर सावरकर हे विज्ञानवादी होते. त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काम नाशिककर कधी करूच शकत नाहीत. मराठी माणूस कधीही करू शकत नाही. त्यावरून जो वाद झाला ती काही चांगली गोष्ट नव्हती.
ADVERTISEMENT