संभाजी महाराज छत्रपती यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाज आणि संभाजीराजेंना दिलेल्या अश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले मराठा बांधव राजेंच्या अंदोलनात विविध मार्गाने सहभाग नोंदवत आहेत. काही गावामध्ये चूलबंद अंदोलन सुरु आहे. तर काही ठिकाणी उत्स्फूर्त बंद पाळण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. इतक्या भयंकर परिस्थितीतही रशियातील नॉर्दर्न स्टेट मेडिकल युनव्हर्सिटीमध्ये मराठी विद्यार्थ्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना व्हीडीओ कॉल करुन अंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या अंदोलनात थेट रशियातून मराठी विद्यार्थ्यांचं नेतृत्व बीड जिल्ह्यातील अनुप मोरे हा वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी करत आहे. मराठा आरक्षण मिळवणे, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे समाजाचे होणारे शैक्षणिक, सामाजिक व नोकऱ्यांमधील नुकसान व या अन्यायाची झळ कमी व्हावी, यासाठी राजेंनी शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या, १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत शासनाने या मागण्या मान्य देखील केल्या आहेत, मात्र आज आठ महिने उलटले तरी अजून त्यांची अंमलबावणी झालेली नाही. मराठा तरुण अजूनही अन्यायाच्या गर्तेतच सापडलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाची आरक्षणावाचून होणारी होरपळ कमी करावी, यासाठी संभाजी महाराज छत्रपती उपोषणास बसले आहेत.
सरकारने शब्द न पाळल्याने उपोषण सुरू करण्याशिवाय पर्यायच उरला नाही-संभाजीराजे
तसेच, या मगण्यांबरोबरच मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारसींचीही अंमलबजाणी करण्यास तातडीने सुरूवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी ही राजेंची आग्रही मागणी आहे.या मागणीला व राजेंच्या अमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी थेट रशियातुन अनुप मोरे , जयराम जगदाळे , मंगेश सावंत, अनिकेत बोंढारे,रोहीत कोल्हे, निशांत साळुंके,चैतन्य घाडगे या विद्यार्थ्यांनी राजेंच्या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंदोलन सुरु केले आहे.
ADVERTISEMENT