ADVERTISEMENT
महाराजा एक्सप्रेसमधील प्रवास हा जगातील सर्वात आलिशान आणि महागडा रेल्वे प्रवास आहे. ही रेल्वे एखाद्या आलिशान 5 स्टार हॉटेलप्रमाणे आहे.
या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना राजा-महाराजांप्रमाणे सुविधा मिळतात.
या ट्रेनचं तिकिट हे तब्बल 18 लाख रुपयांना आहे. यामध्ये कधी-कधी चढ-उतारही होतात.
महाराजा एक्सप्रेस ही 2010 साली सुरु झाली होती. एक किलोमीटर लांब असलेल्या या ट्रेनमध्ये एकूण 23 डब्बे आहेत. ज्यामध्ये फक्त 88 प्रवासी प्रवास करु शकतात.
महाराजा एक्सप्रेस ही दिल्ली, आग्रा, बिकानेर, फतेहपूर सिक्री, ओरछा, खजुराहो, जयपूर, जोधपूर, उदयपूर, रणथंबोर, वाराणसी आणि मुंबई दर्शन घडवते.
सध्या महाराजा एक्सप्रेसमध्ये चार टूर पॅकेज आहेत. ज्यामध्ये 3 पॅकेज 7 दिन 6 रात्री आणि एक पॅकेज 4 दिवस 3 रात्रीचं आहे. सर्व पॅकेज रेट वेगवेगळे आहेत.
ट्रेनमध्ये ऑनबोर्ड रेस्टॉरंट, डिलक्स केबिन, ज्युनिअर सुइट आणि लाँज बार सारख्या अनेक महागड्या आणि आलिशान सुविधा आहेत.
महाराजा एक्सप्रेसमध्ये 88 प्रवाशांसाठी एकूण 43 गेस्ट केबिन आहेत. ज्यामध्ये 20 डिलक्स केबिन, 18 ज्युनिअर सुइट, 4 सुइट आणि 1 ग्रँड प्रेसिडेन्शियल सुइट आहे.
ज्युनिअर सुइटमध्ये डबल बेडसह इंटरनॅशनल कॉलिंग, LCD टीव्ही, एसी, थंड आणि गरम वातावरण सुविधा, प्रायव्हेट बाथरुम आणि लॉकर याची सुविधा आहे.
ADVERTISEMENT