MHT CET 2024 Result Updates : महाराष्ट्र CET सेल आज 16 जून 2024 रोजी PCM आणि PCB साठी महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (MHT CET) चा निकाल जाहीर करेल. या प्रवेश परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन MHT CET निकाल पाहण्यास आणि डाउनलोड करण्यास सक्षम असतील. (mht cet result 2024 where and how to check maharashtra cet exam result)
ADVERTISEMENT
MHT CET निकालाची लिंक संध्याकाळी 6 वाजता अॅक्टिव्ह होईल. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे PCM ची परीक्षा 2 मे ते 17 मे या कालावधीत घेण्यात आली होती आणि 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान PCB ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तसंच MHT CET ची उत्तरपत्रिक 21 मे रोजी प्रकाशित करण्यात आली होती. एमएचटी सीईटी उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना 26 मे पर्यंत वेळ देण्यात आला होता.
हेही वाचा : वायकरांची खासदारकी राहणार की जाणार? 'निकाल' संशयाच्या भोवऱ्यात!
MHT CET निकाल पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक भरणे आवश्यक आहे. MHT CET 2024 स्कोअरकार्डमध्ये उमेदवाराचे परीक्षेतील गुण आणि उमेदवाराचे नाव, विषय, एकूण टक्केवारी गुण, अखिल भारतीय रँक, पात्रता स्थिती, पालकांचे नाव, अर्ज क्रमांक आणि श्रेणी यांसारखी माहिती असेल.
हेही वाचा : Narayan Rane : कोकणात राणे-सामंतांमध्ये बॅनर'वार'; महायुतीत संघर्षाच्या ठिणग्या
MHT CET निकाल 2024 कसा आणि कुठे पाहायचा?
- MHT CET निकाल पाहण्यासाठी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर MHT CET निकालाची लिंक निवडा.
- नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख हे सर्व तपशील त्यामध्ये भरा.
- यानंतर स्क्रीनवर स्कोअरकार्ड दिसेल.
- स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
हेही वाचा : Ravindra waikar : ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वायकरांच्या नातेवाईकाकडून वापर
MHT CET परीक्षेद्वारे नेमका कोणत्या क्षेत्रात प्रवेश मिळतो?
MHT CET महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यस्तरीय परीक्षा आहे, जी राज्यातील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जसं की, इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात.
एमएचटी सीईटी परीक्षेच्या पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतात. पेपर 1 हा अशा उमेदवारांसाठी आहे ज्यांना इंजिनीअरिंग करायचे आहे. तर, पेपर 2 ज्यांना फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम करायचे आहे त्यांच्यासाठी असतो.
ADVERTISEMENT