भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची जगभरात चर्चा होतेय. शेतकरी आंदोलनावर जगभरातल्या सेलिब्रेटींकडून ट्विट टाकून पाठिंबा दिला जातोय. रिहाना, मिया खलिफा, अमांडा सर्नी या परदेशी सेलिब्रेटींच्या ट्विटने भारतात खळबळ उडवून दिलीय. यावरून त्यांना ट्रोलही केलं जातंय.
ADVERTISEMENT
मिया खलिफा आणि रिहानाला तर सोशल मीडियावर भयंकर ट्रोल केलं जातंय. पैसे घेऊन शेतकरी आंदोलनाबद्दल बोलत असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. ही आरोपबाजी सुरू असतानाही त्यांनी आंदोलनाचं आपलं पाठबळ कायम ठेवलंय.
मिया-अमांडाकडून ट्रोलर्सची मस्करी
मिया खलिफा आणि अमांडा सर्नी यांना यूजर्सनी ट्रोल केलं जातं. पण आपल्याला ट्रोल करणाऱ्यांची त्यांनी मस्करी केली. त्यां ट्रोलर्सचा जोरदार समाचार घेत आहेत. अमांडाने एक ट्विट केलं. त्यात तिने पैसे घेऊन ट्विट करण्याबद्दल आपलं मत मांडलं.
तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ‘हे केवळ त्रास देण्यासाठी सुरू आहे. मला अनेक प्रश्न पडलेत. मला कोण पैसे देतंय? मला किती पैसे मिळत आहेत? मी आपल्याला बिल कुठे पाठवू? मला पैसे कधी मिळणार? मी खूप ट्विट केलेत. त्यामुळे मला जास्तीचे पैसे मिळणार का?’
यावर मिया खलिफानं लिहिलंय, ‘पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही ट्विट करणं सुरू ठेऊ.’
ट्रोलर्सची फिरकी घेणारे अमांडा आणि मिया खलिफाचे ट्विट खूप वेगानं व्हायरल होत आहेत. या ट्विट्सला त्यांच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. एवढंच नाही तर मिया ट्रोलर्सची थट्टा म्हणून पैसे मिळाल्याचा एक स्क्रीनशॉटही शेअर केलाय.
ADVERTISEMENT