देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थानापैकी एक मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. देशभरातून २८ व्यक्तींची नेमणूक या ट्रस्टवर केली जाते. ज्यात महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जाणाऱ्या मिलींद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या ट्रस्टवर सदस्य म्हणून नाव यावं यासाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री यासाठी थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधून आपली नावं सुचवत असतात. मिलींद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांचं नातं हे जगजाहीर आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी मिलींद नार्वेकरांच्या नावाची शिफारस केल्याचं कळतंय.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या नावाची शिफारस केल्याचं समजतंय. शिवसेनेच सचिव पदाची भूमिका सांभाळणाऱ्या मिलींद नार्वेकर यांच्याकडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रिमीअर लिगच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. शिवसेना पक्षाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये मिलींद नार्वेकर यांचा सहभाग असतो. त्यामुळे तिरुपती देवस्थान समितीवर त्यांची नेमणूक महत्वपूर्ण मानली जात आहे.
कोण आहेत मिलींद नार्वेकर?
मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.
काही वर्षांपूर्वी मिलींद नार्वेकर शाखाप्रमुखाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळी नार्वेकर यांचा संवाद साधण्याची शैली, हुशारी पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांची आपल्या स्वीय सचिव पदावर नेमणूक केली. यानंतर नार्वेकर अजुनही उद्धव ठाकरेंचा राईट हँड ही आपली भूमिका नेमाने बजावत आहेत.
अशी असेल तिरुपती देवस्थान समितीच्या नव्या ट्रस्टची यादी –
पोकला अशोक, मल्लाडी कृष्णा राव, तंगुतुरु मारुती प्रसाद, मान्ने जीवन रेड्डी, बंडी पार्थसारथी रेड्डी, जुपाली रामेश्वर राव, एन.श्रीनिवासन, राजेश शर्मा, बोरा सौरभ, मुर्मशेट्टी रामलु, कवकुर्ती विद्यासागर, ए.पी. नंद कुमार, पचिपला सनथ कुमार, वेमिरेड्डी प्रशांती रेड्डी, केथन देसाई, बुडाती लक्ष्मी नारायण, मिलींद केशव नार्वेकर, एम.एन.शशिधर, अलुरी मल्लेश्वरी, एस.शंकर, एस.आर.विश्वनाथ रेड्डी, बुर्रा मधुसुदन यादव, किलीवेटी संजीव, काथसनी रामभुपाल रेड्डी
ADVERTISEMENT