राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाच विसर पडला आहे. सभेत बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख केला. त्यांना व्यासपीठावरच्या लोकांनी चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी ती सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला.
ADVERTISEMENT
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आणि मुख्यमंत्री पदी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना विराजमान केले. असं असलं तरी दोन वर्षापासून कार्यरत असलेल्या मुख्यमंत्र्यांचा विसर मंत्रिमंडळातील मंत्र्याला पडलाय. राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख व्यासपीठावरील लोकांनी मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न भरणे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस आठ वर्षांपासून शिवसेनेला संपवण्याचं राजकारण करत आहेत-नवाब मलिक
इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमातल्या भाषणात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याने यावेळी व्यासपीठावरचे सगळेही चकीत झाले. यावेळी व्यासपीठावरील माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर भरणे यांनी ही तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव घेतले आणि म्हणाले की सतत डोक्यात खूप विचार असल्याने असं कधी कधी होतं.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता-शरद पवार
राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत, असे असतानादेखील मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर ती असताना मुख्यमंत्र्याचे नावाचा विसर पडल्याची चर्चा इंदापुरात होती, त्यांच्याकडे अनेक खाते असल्यामुळे त्यांचा व्यापही मोठा आहे, त्यामुळे कधीमधी अशी चूक होऊ शकते असंही काही जणांचं म्हणणं आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तोंडात आजही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचेच नाव असल्याचे दिसून आले आहे, कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात इंदापूर चे आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांना विकास निधी देण्यात फडणवीस यांनी कायम हात सैल सोडला होता म्हणून की काय आजही महाविकास आघाडीच्या काळात देखील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव भरणे यांच्या तोंडात आले असल्याची चर्चा इंदापूर शहरासह तालुक्यात होती.
ADVERTISEMENT