सीमावाद: ‘म्हणून आम्ही कर्नाटकात गेलो नाही..’, शंभूराज देसाईंनी सांगितलं खरं कारण

ऋत्विक भालेकर

• 08:45 AM • 07 Dec 2022

Shambhuraj Desai: मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) यांच्यातील सीमावाद (Border Dispute) चांगलाच उफाळून आला आहे. हा वाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते हे बराच धुमाकूळ घालत आहेत. महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोडही त्यांच्याकडून केली जात आहे. असं असताना महाराष्ट्र सरकार अद्यापही संयमाची भूमिका घेताना दिसून येतंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

Shambhuraj Desai: मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) यांच्यातील सीमावाद (Border Dispute) चांगलाच उफाळून आला आहे. हा वाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते हे बराच धुमाकूळ घालत आहेत. महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोडही त्यांच्याकडून केली जात आहे. असं असताना महाराष्ट्र सरकार अद्यापही संयमाची भूमिका घेताना दिसून येतंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही मंत्री हे बेळगावला (Belgaum) जाणार होते. मात्र, अचानक त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. ज्यावरुन विरोधकांनी त्यांना बरंच टार्गेट केलं. आता याचबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी नेमकं खरं कारण सांगितलं आहे. (minister shambhuraj desai reveals real reason given for canceling the karnataka tour maharashtra karnataka border dispute)

हे वाचलं का?

कर्नाटकमधील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्री हे काल (6 डिसेंबर) कर्नाटकात जाणार होते. मात्र, त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला. ज्यामुळे राज्य सरकारवर बरीच टीका झाली. याचबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी आज (7 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

‘महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही बेळगावमध्ये गेलो नाही. 850 गावातील नागरिकांचं म्हणणं आहे की, आम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे’ असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी रद्द केलेल्या कर्नाटक दौऱ्याबाबत दिलं आहे.

संजय राऊतांवर टीकेची झोड

दरम्यान, कर्नाटक सीमा प्रकरणी राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्याचं म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. आता राऊतांच्या याच टिकेला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देताना टीकेची झोड उठवली आहे. पाहा नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद काय आहे? : भाजपची सत्ता असलेली २ राज्य का आली आमनेसामने?

‘शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केले त्याचा मी धिक्कार करतो. केंद्राने या विषयात लक्ष द्यावं यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करत आहेत. संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की, साडे तीन महिने आराम करून आला आहात पुन्हा तशी वेळ येऊ देऊ नका.’

‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापेक्ष त्यांना शरद पवार यांचं नेतृत्व महत्त्वाच वाटतं आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना मागील अडीच वर्षापासून सांगत होतो की, आपला पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला आहे. आता अखेर तेच समोरं येत आहे.’

‘एकनाथ शिंदे यांना कर्नाटकात किती मारहाण झाली हे त्यांनी विधानसभेत सांगितलं आहे. ते 40 दिवस जेलमध्ये होते. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतः लढ्यात उतराव आणि मग मुख्यमंत्र्यांबाबत बोलावं. जर त्याचं बोलणं थांबलं नाही तर आम्ही त्यांना जश्यास तसं उत्तर देऊ.’

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना आव्हान, ‘…मग भाईगिरी दाखवा ना’

‘संजय राऊत आमच्या मतावर निवडून आले आहेत. आम्ही ठरवलं असतं तर माजी खासदार झाले असते. आम्हाला एकनाथ शिंदे यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना मतदान केलं. आमची भाईगिरी संजय राऊतांनी पाच महिन्यापूर्वी पाहिली आहे. आम्ही ठरवलं असतं तर ते माजी खासदार म्हणून कुठतरी कोपऱ्यात बसले असते.’

‘ज्यांनी अडीच वर्षात केवळ फेसबुकवर सरकार चालवलं त्यांनी आम्हाला सांगू नये. काँग्रेसच्या अध्यक्षासमोरं उद्धव ठाकरे कसे नमतात हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आपण एसटी बस थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे गाड्यांना संरक्षण देऊ.’ अशा शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

    follow whatsapp