अकोला जिल्ह्यात शिवसेना पक्षातला अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जिल्ह्याचे माजी प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला पत्र लिहून बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे. पिंजरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, दिवाकर रावते अशा ज्येष्ठ नेत्यांना हे पत्र लिहीलं असल्यामुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
काय आहेत श्रीरंग पिंजरकर यांनी केलेले आरोप?
१) आमदार नितीन देशमुख हे खंडणीखोर आहेत. जिल्ह्यात खंडणी वसुलीत आमदार देशमुख सर्वात समोर असल्याचा आरोप पिंजरकरांनी पत्रात केला आहे.
२) जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटदार नितीन देशमुखांना धास्तावले असल्याचा पिंजरकरांचा आरोप.
३) जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी आमदार देशमुख भाजपाशी संधान साधत असल्याचा पिंजरकर यांचा पत्रात गंभीर आरोप.
४) नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने नेमणुका करण्याची मागणी.
अकोला जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या या वादाला किनाल लाभलेली आहे ती म्हणजे विधान परिषद निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची. विधानपरिषदेवर तीन वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या गोपीकिशन बजोरीया यांना भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. हा पराभव आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या दगाफटक्यामुळे झाल्याचा आरोप बजोरिया गटाने केला होता.
बीडमध्ये अवैध धंद्यांना संदीप क्षीरसागर यांचं संरक्षण, शिवसेनेचा राष्ट्रवादीवर निशाणा
जिल्ह्यातील बजोरिया गटातील असंतुष्ट नेत्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाचे सचिव अनिल देसाई यांची भेट घेत आपल्या नाराजीचं पत्र दिल्याचं समोर येतंय. गोपीकिशन बजोरियांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाल्याचं कळतंय. दरम्यान आमदार नितीन देशमुखांनी आपल्यावरील झालेले आरोप फेटाळले असले तरीही कॅमेऱ्यासमोर अधिक काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
शिवसैनिकांची थेट पोलीस चौकी ताब्यात घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत
ADVERTISEMENT