कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आता परिस्थिती हळुहळु नियंत्रणात येते आहे. परंतू तज्ज्ञ डॉक्टरांनी आगामी काळात राज्या तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवला आहे. यासाठी राज्य सरकारने आधीच तयारी सुरु करायचं ठरवलं आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील मालाड भागात MMRDA मार्फत जम्बो कोविड सेंटर उभारणीचं काम हाती घेण्यात आलंय.
ADVERTISEMENT
मुंबई शहर आणि उप-नगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख आणि MMRDA चे आयुक्त आर.ए.राजीव यांच्या उपस्थितीत या कोविड सेंटरच्या भूमिपुजन सोहळा पार पडला. ज्यानंतर या कोविड सेंटरच्या बांधकामाला सुरुवातही झाली.
भविष्यातील तिसऱ्या लाटेचा विचार करुन आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी या कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. रुग्णांना या सेंटरमध्ये सर्व सुविधा मिळाव्यात याची काळजी घेतली जाणार असल्याचंही यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून राज्य सावरतंय, पण…जाणून घ्या आजची आकडेवारी
मालाडच्या रहेजा मैदानावर होणाऱ्या कोविट सेंटरमध्ये २१४० बेड, विलगीकरणात उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी ३८४ बेड, १५८४ ऑक्सिजन बेड, १९० आयसीयू बेड, २० डायलेसिस युनिट वॉर्ड अशी सोय असणार आहे. यात पार्किंगपासून रुग्णांना अन्य सर्व सोयीसुविधा मिळणार आहेत. याचसोबत या सेंटरमध्ये रुग्णांना त्यांच्या परिवारातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडीओ कॉलिंगची सुविधाही मिळणार असल्याचं MMRDA चे आयुक्त व्ही.ए. राजीव यांनी सांगितलं. जूनच्या मध्यावधीत हे कोविड सेंटर तयार असेल अशी ग्वाही यावेळी MMRDA ने दिली.
ADVERTISEMENT