ADVERTISEMENT
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबादमधील सभेसाठी रवाना झाले.
औरंगाबादला जाताना राज ठाकरे हे पुणे आणि वढू बुद्रूक येथे थांबले होते.
पुण्यात पुरोहितांकडून आशीर्वाद घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने निघाले.
त्यांनंतर पुणे-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या वढू बुद्रूक येथे राज ठाकरे थांबले.
वढू बुद्रूक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे.
राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट दिली आणि दर्शन घेतलं.
वढू बुद्रूकमध्ये राज ठाकरे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर त्यांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. नागरिकांनी समाधी व परिसरात मनमोहक आशा फुलांची सजावट केली होती.
राज ठाकरे यांना बघण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
ADVERTISEMENT