राज ठाकरे उद्धव ठाकरेंना का म्हणाले, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’

मुंबई तक

10 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:57 AM)

सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नसतं, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रातून इशाराच दिला आहे. भोंग्याच्या वादामुळे चर्चेत आलेल्या राज ठाकरेंनी आपल्या तिन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर तशी थेट टीका केली नव्हती. मात्र आता त्यांनी उद्धव ठाकरेंनाच इशारा दिला आहे. काय […]

Mumbaitak
follow google news

सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नसतं, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रातून इशाराच दिला आहे. भोंग्याच्या वादामुळे चर्चेत आलेल्या राज ठाकरेंनी आपल्या तिन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर तशी थेट टीका केली नव्हती. मात्र आता त्यांनी उद्धव ठाकरेंनाच इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी पत्रात?

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सस्नेह जय महाराष्ट्र!

सर्व देशबांधवांना मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडालय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीर राज्य सरकारने कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांनाही पोलीस असे काही शोधत आहेत जणू काही ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत. अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे देश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

राज्य सरकारला माझं एकच सामगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही.

आपला-राज ठाकरे

असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे आणि त्यांच्यावर पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणात टीका केली आहे. २ एप्रिलला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी सभा घेतली होती. त्यानंतर १२ एप्रिलला त्यांनी उत्तर सभा घेतली. १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेतली. या सगळ्या सभांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख टाळला होता. आता मात्र थेट उद्धव ठाकरेंनाच त्यांनी इशारा दिला आहे. आता यावर उद्धव ठाकरे काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp