Mumbai Local दोन डोस घेतलेल्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय , मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई तक

• 07:15 AM • 09 Aug 2021

मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. कोरोनाच्या काळात ही लोकल सामान्यांसाठी बंद होती. मात्र 15 ऑगस्टपासून ही लोकल सामान्यांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांच्यासाठी किमान मुंबईची लोकल सुरू करावी अशी मागणी […]

Mumbaitak
follow google news

मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. कोरोनाच्या काळात ही लोकल सामान्यांसाठी बंद होती. मात्र 15 ऑगस्टपासून ही लोकल सामान्यांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांच्यासाठी किमान मुंबईची लोकल सुरू करावी अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. यानंतर 8 तारखेच्या संध्याकाळी जे फेसबुक लाईव्ह झाले त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे मनसेच्या ट्विटमध्ये?

‘मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असताना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल’ ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं मनसे स्वागत करत आहे. असं ट्विट मनसेने केलं आहे.

मुंबईतील लोकल प्रवास हा सर्वांसाठी सरसकट सुरु करण्यात येणार नाही. कारण लोकल प्रवासासाठी काही नियम तयार करण्यात आले आहे. ते नियम पाळूनच मुंबईत लोकल प्रवास करता येणार आहे.

जाणून घ्या लोकल प्रवासासाठी नेमके काय नियम असणार:

लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार

दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी अनिवार्य

स्मार्टफोनवर रेल्वे पास डाऊनलोड करण्याची सोय

स्मार्टपोन नसल्यास प्रभाग कार्यालये, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर फोटो पासेस

पासवरील क्यूआर कोडमुळे अधिकृतता कळणार

लोकल प्रवासाबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

‘मी आपुलकीच्या भावनेतून सांगतो आहे की, काही ठिकाणी आपण शिथिलता आणतो आहोत. जसं मुंबईचा विचार केल्यास मुंबईचा लोकल प्रवास कधी सुरु करणार. तर लोकल प्रवास आपण सुरु करतो आहोत ते आपल्या स्वातंत्र्य दिनापासून. म्हणजेच 15 ऑगस्टपासून.15 ऑगस्टपासून लोकल माझ्या मुंबईतील नागरिकांना तिचा उपयोग करता येईल. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आणि दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेले आहेत त्यांना ही मुभा आपण देत आहोत.’

    follow whatsapp