खळ्ळ खट्याक, MNS कार्यकर्त्यांकडून भिवंडी टोलनाक्याची तोडफोड

मुंबई तक

• 11:23 AM • 20 Aug 2021

टोल नाक्यांवरुन महाराष्ट्रात आंदोलन केलेल्या मनसेने पुन्हा एकदा आपलं जुनं रुप रस्त्यावर दाखवलं. भिवंडी शहरातला मालोडी टोल नाक्यावर आज मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. भिवंडीतील मानकोली-अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी गाव समितीच्या माध्यमातून बुधवारी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. गुरुवारी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे […]

Mumbaitak
follow google news

टोल नाक्यांवरुन महाराष्ट्रात आंदोलन केलेल्या मनसेने पुन्हा एकदा आपलं जुनं रुप रस्त्यावर दाखवलं. भिवंडी शहरातला मालोडी टोल नाक्यावर आज मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

हे वाचलं का?

भिवंडीतील मानकोली-अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी गाव समितीच्या माध्यमातून बुधवारी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. गुरुवारी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका बंद केला होता. परंतू मनसे कार्यकर्त्यांची पाठ फिरताच सुप्रीम कंपनीने हा टोलनाका पुन्हा सुरु केला.

यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आज मालोडी टोलनाक्यावर जाऊन केबिनची तोडफोड केली. आधी रस्त्याची काम पूर्ण करा आणि त्यानंतर टोलनाका सुरु करा अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला. यावेळी टोलनाक्यावरचे कर्मचारी मनसे कार्यकर्त्यांचा रुद्रावतार पाहून घटनास्थळावरुन माघारी फिरले.

Buldhana Accident : सिंदखेडराजा जवळ रस्ते अपघातात १३ कामगारांचा मृत्यू

टोल वसुली करुनही कंपनी रस्त्याचं बांधकाम चांगल्या पद्धतीने करत नाहीये. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना या खराब रस्त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे कंपनीने आधी रस्ता तयार करुन मगच टोल वसुली करावी अशी मागणी मनसेने केली आहे.

नो-पार्किंगमध्ये पार्क केलेली बाईक पोलिसांनी चालकासह उचलली, Pune पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

    follow whatsapp