Mobile Addiction in Marathi : तुमचा मुलगा किंवा तुमच्या जवळची व्यक्ती मोबाईलच्या आहारी गेलेली असेल, तर वेळीच सावध व्हा. अंमली पदार्थाप्रमाणे मोबाईलही मुलं आणि माणसांसाठी घातक ठरू लागला आहे. याचीच प्रचिती देणारी घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाने आईसोबत असं काही केलं की अख्खं गाव हादरून गेलं.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नूर जिल्ह्यातील कनिचिरा येथे राहणाऱ्या 63 वर्षीय महिला रुग्मिणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्मिनी यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूचं कारण ठरलं मुलगा सुजित याला लागलेलं मोबाईलचे व्यसन.
झालं असं की, मुलगा सुजित याला मोबाईलचं व्यसन लागलं होतं. त्यावरून रुग्मिणी यांनी विचारपूस केली. इतकंच नाही, तर मोबाईलचा वापर कमी कर, असं त्या म्हणाल्या. मोबाईलचा वापर कमी करण्यास सांगितले.
यावरून मुलगा सुजितला राग आला.
सुजितने रागातच आईवर अमानुष हल्ला केला. आईचं डोके पकडून भिंतीवर आपटले. यात रुग्मिणी या गंभीर जखमी झाल्या.
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
रुग्मिणी जखमी झाल्याचं दिसल्यानंतर घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. रुग्मिणी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी महिलेच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत महिलेच्या मुलाने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीला करण्यात आले होते मानसिक उपचार
चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने त्याच्या आईवर हल्ला केला कारण तिने त्याला मोबाईल फोन वापरण्यापासून रोखले होते. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला एकदा कोझिकोडमधील कुथिरावट्टम येथील सरकारी मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मोबाईलचे व्यसन धोकादायक का आहे?
बर्याच प्रमाणात स्मार्टफोन वापरण्याचे व्यसन वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू लागते. ऑफिस, कॉलेज किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात जात असताना अनेक वेळा लोक फोनवर व्यस्त राहतात, ज्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होतो.
हेही वाचा >> Manoj Jarange : ‘लावलं रताळू आली केळी’, जरांगेंवर गुणरत्न सदावर्तेंचा वार
याशिवाय मोबाईलचे व्यसनही ‘रिअल लाइफ’पासून दूर घेऊन जाते. कुणासोबत बसूनही काही लोक बोलण्याऐवजी फोनवरच व्यस्त राहतात. या कारणामुळे समोर बसलेल्या व्यक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
या प्रकरणाबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सत्यकांत त्रिवेदी सांगतात की, सध्याच्या काळात मोबाईलमध्ये खूप सुधारणा झाल्या आहेत. मोबाईलमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले आहे.
हेही वाचा >> Sextortion : तरुणीने टाकलं प्रेमाचं जाळं अन् रेल्वे कर्मचाऱ्याचा गेला जीव; करु नका ‘ही’ चूक
मोबाईलवर दिसणारे जग इतके आकर्षक दिसते की, लहान मुलांना सोडा, मोठ्यांनाही त्याचे व्यसन लागते. मोबाईलच्या या जादूमध्ये अडकून किती वेळ फोन वापरावा हेच त्यांना कळत नाही. गरजेनुसार वापरण्यासाठी मोबाईल हा योग्य पर्याय असू शकतो.
आठवड्यातून एकदा फोनशिवाय रहा
तज्ज्ञांचे मत आहे की, आपण आठवड्यातून एकदा तरी मोबाईल फोनपासून अंतर ठेवले पाहिजे. जेव्हा तुम्ही असे करण्याचा विचार कराल तेव्हा तुमच्या फोनशिवाय बाहेर जा. मित्रांना भेटा, त्यांच्याशी बोला, हँग आउट करा. अशा कृतींनी मोबाईलची सवय हळूहळू कमी करता येईल.
ADVERTISEMENT