रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार

मुंबई तक

• 08:41 AM • 31 Oct 2022

पुण्याजवळच्या रांजणगाव या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घो,णा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत. या अंतर्गत दोन हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून महाराष्ट्राला गिफ्ट राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्राला […]

Mumbaitak
follow google news

पुण्याजवळच्या रांजणगाव या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घो,णा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत. या अंतर्गत दोन हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

मोदी सरकारकडून महाराष्ट्राला गिफ्ट

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिफ्ट मिळालं असल्याचं बोललं जातं आहे. पुण्यातल्या रांजणगाव या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आलं आहे. २००० कोटींची गुंतवणूक यासाठी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ५ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. २९७ एकर जागेवर हे क्लस्टर उभारलं जाणार आहे. त्यासाठी ४९२ कोटींचा खर्च होणार आहे. २०७.९८ कोटी हे केंद्र सरकारतर्फे दिले जाणार आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश मिळाले असून या संदर्भात दिल्लीत आज घोषणा करण्यात आली आहे, गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे समजते. दरम्यान, दिल्लीतील अधिकारी पुण्यात येऊन गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती. त्यानंतर आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतीच दिल्लीत ही घोषणा केली आहे.

राज्यमंत्री राजीव शेखर यांनी काय म्हटलं आहे?

राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, केंद्र सरकारकडून या योजनेला समर्थन मिळत असून आर्थिक निधी देण्यात येणार आहे, स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोनाच्या काळानंतर इलेक्ट्रॉनिक ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारत एक महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल उत्पादन देशासह जगातही पोहचतील. चीननंतर आता भारतात आणि व्हिएतनाम देशात याचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरूपती, आणि आता पुण्यातील रांजणगाव येथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प भविष्यात यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच सी डॅकचा एक इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात होणार आहे. या प्रकल्पांची किंमत साधारण एक हजार कोटी रूपये आहे असे चंद्रशेखर म्हणाले.

    follow whatsapp