Monsoon onset in Kerala: पावसाचं देवभूमीत पाऊल! महाराष्ट्रात लवकरच होणार दाखल

मुंबई तक

• 10:20 AM • 29 May 2022

तिरुअनंतपूरम: मान्सूनबहवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आहे. आज 29 मे रोजी मान्सून भारताच्या देवभूमीत म्हणजेच केरळमध्ये दाखल झाला आहे. IMD नुसार, मान्सूनने केरळमध्ये सामान्य वेळेपेक्षा 3 दिवस आधीच धडक दिली आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आता येत्या काही दिवसांत केरळच्या उर्वरित भागासह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होत हळूहळू पुढे सरकेल. बंगालच्या उपसागरात ‘आसानी’ या […]

Mumbaitak
follow google news

तिरुअनंतपूरम: मान्सूनबहवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला आहे. आज 29 मे रोजी मान्सून भारताच्या देवभूमीत म्हणजेच केरळमध्ये दाखल झाला आहे. IMD नुसार, मान्सूनने केरळमध्ये सामान्य वेळेपेक्षा 3 दिवस आधीच धडक दिली आहे

हे वाचलं का?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आता येत्या काही दिवसांत केरळच्या उर्वरित भागासह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होत हळूहळू पुढे सरकेल. बंगालच्या उपसागरात ‘आसानी’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या वेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तवला होता.

मान्सून 16 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेच्या खूप आधी पोहोचला होता आणि चक्रीवादळाच्या उर्वरित प्रभावामुळे तो पुढे जाण्याची अपेक्षा होती आणि तसंच होत असताना आता दिसत आहे.

मान्सून 16 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेच्या खूप आधी पोहोचला होता आणि चक्रीवादळाच्या उर्वरित प्रभावामुळे तो पुढे जाण्याची अपेक्षा होती आणि तसंच होत असताना आता दिसत आहे.

देशात यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस, हवामान खात्याने जाहीर केला पहिला अंदाज

हवामान खात्याने व्यक्त केला पावसाचा अंदाज

मान्सूनच्या प्रवेशामुळे केरळमध्ये 29 मे ते 1 जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी 30 मे रोजी लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सून केरळमध्ये लवकर पोहचलेला असल्याने महाराष्ट्रात देखील पावसाला लवकरच सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता बळीराजा देखील मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

मान्सूनच्या आगमनापूर्वी केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. केरळमधील हवामान पुढील काही दिवस असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

केरळमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि वीजांचा गडगडाट असं वातावरण असणार आहे. केरळमध्ये आज (29 मे) रोजी किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

बिहार आणि झारखंडमध्ये पावसाचा अंदाज

हवामान खात्यानुसार, आज बिहार आणि झारखंडच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. बिहार आणि झारखंडमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    follow whatsapp