देशभरात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, इंधनांचे वाढते दर, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे. विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार अशून सरकारचं लक्ष मात्र विधेयकं मंजूर करुन घेण्याकडे असणार आहे.
ADVERTISEMENT
कोरोना काळात देशातलं गैरव्यवस्थापन, अनेक राज्यांत जाणवलेला लसीचा तुटवडा, इंधर दरवढा, घरगुती सिलेंडरच्या वाढलेल्या किमती या सर्व मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केलेली आहे. दरम्यान या अधिवेशनात सरकार नवीन १७ विधेयकं मांडणार आहेत. यामधील ३ विधेयकं आधी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशासंदर्भातली आहेत.
पंतप्रधान संसदेच्या अधिवेशनात विविध विषयांवर सरकार व्यापक, अर्थपूर्ण चर्चेस तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले. या बैठकीत ३३ पक्षांचे खासदार उपस्थित होते. संसदेत विविध विषयांवर लोकप्रतिनिधी, विशेषत: विरोधकांच्या सूचना महत्त्वपूर्ण आहेत, असे मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT