महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे, जर ही संख्या अशाच पद्धतीने वाढत राहिली तर राज्य कडक निर्बंधांकडून लॉकडाऊनच्या दिशेने जाऊ शकतं. आज महाराष्ट्रात १३ हजार ६५९ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ५४ कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.३४ टक्के इतका आहे. दिवसभरात ९ हजार ९१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत २० लाख ९९ हजार २०७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.२१ टक्के झाला आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा..
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७१ लाख ५३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ५२ हजार ५७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७१ हजार १८७ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार २४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ९९ हजार ८ रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात १३ हजार ६५९ नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडल्याने राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या २२ लाख ५२ हजार ५७ इतकी झाली आहे.
आज झालेल्या ५४ मृत्यूंपैकी ३४ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत तर १८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २ मृत्यू एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत. हे २ मृत्यू अकोला १ आणि ठाणे १ असे आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown
महाराष्ट्रातली प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई ९ हजार ९७३
ठाणे १० हजार ४६०
पुणे १८ हजार ४७४
नाशिक ४ हजार ५२५
औरंगाबाद ४ हजार ५३४
अमरावती ५ हजार २५९
अकोला ४ हजार १४२
नागपूर १२ हजार ७२४
अॅक्टिव्ह रूग्णांच्या संख्येचा विचार केला तर पुणे, नागपूर आणि ठाणे या तीन शहरांमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. नागपुरातही लॉकडाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे कारण कोरोना प्रतिबंधात्मक नियम लोक पाळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोरोनाची रूग्णसंख्या अशाच पद्धतीने वाढू लागली तर राज्याची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने होऊ शकते.
ADVERTISEMENT