महाराष्ट्रात दिवसभरात २७ हजार ९१८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात २५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. आजचा दिवसही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रात दिवसभरात २३ हजार ८२० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात दिवसभरात २३ हजार ८२० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत २३ लाख ७७ हजार १२७ कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८५.७१ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज १३९ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा १.९६ टक्के आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात Lockdown लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…
आजवर तपासण्यात आलेल्या १ कोटी ९६ लाख २५ हजार ६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७ लाख ७३ हजार ४३६ नमुने पॉझिटिव्ह झाले आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ५६ हजार ६९७ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर १७ हजार ६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ३ लाख ४० हजार ५४२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यात दिवसभरात २७ हजार ९१८ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या ही २७ लाख ७३ हजार ४३६ इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात नोंद झालेल्या १३९ मृत्यूंपैकी ७२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ४५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू धुळे ७, जळगाव ३, ठाणे ३, पुणे ३, सोलापूर २, वाशिम १, अहमदनगर १, बीड १ आणि बुलढाणा १ असे आहेत.
लॉकडाऊनबद्दल काय म्हणाले राजेश टोपे?
‘सध्या आपल्याकडे असलेली संसाधनं म्हणजेच बेड्स, डॉक्टर्स, औषधं या सगळ्याचं आपण मोजमाप रोज करत असतो. जेणेकरून आपण समोर आलेल्या संकटाचा समर्थपणे सामना करू शकतो. लॉकडाऊन हा जो विषय आहे तो कुणालाच मान्य नाही, तो कुणाला आवडतही नाही. पण परिस्थिती जेव्हा तशी येते तेव्हा तहान लागल्यावर विहिर खणण्यात अर्थ नसतो. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. कारण त्यांनी आम्हा सगळ्यांसोबत चर्चा केली आहे. काही निर्बंध कडक करायचे असतील तर काय करायचं? उद्योग क्षेत्राला हात लावला जाणार नाही, बांधकाम व्यवसायाला धक्का लागू नये या सगळ्यासाठी अभ्यास सुरू आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई-४७ हजार ७४२
ठाणे-३७ हजार ५१२
पुणे-५७ हजार ६९४
नाशिक-२८ हजार ९७९
जळगाव-६ हजार ५६५
औरंगाबाद-२० हजार ५२५
नांदेड- १५ हजार ६६८
अकोला- ४ हजार ६१९
नागपूर ४५ हजार ३०३
महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण हे पुणे आणि नागपुरात आहेत. पुण्यात ५७ हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत तर नागपुरात ४५ हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. नागपुरात तर रूग्णांना बेड मिळत नाहीत अशी स्थिती आहे.
ADVERTISEMENT