महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजार 530 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे तर 52 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. तर राज्यात 3 हजार 685 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 63 लाख 92 हजार 706 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 62 लाख 25 हजार 304 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 4 हजार 147 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 96 हजार 176 व्यक्ती होम क्वारंटाईन 1875 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 49 हजार 671 सक्रिय रूग्ण आहेत.
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई 5393
ठाणे-7253
रत्नागिरी-1157
पुणे-13101
सातारा-4474
सांगली- 2018
कोल्हापूर-1172
सोलापूर-2759
अहमदनगर-6898
महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रूग्ण पुणे जिल्ह्यात आहेत हेच ही आकडेवारी सांगते आहे. तसंच त्यानंतर ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये सक्रिय रूग्ण सर्वाधिक आहेत.
मुंबईत 367 नवे रूग्ण
मुंबईत दिवसभरात 367 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 408 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 12 हजार 570 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आज घडीला 4696 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 1286 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात 178 नवे रूग्ण
पुण्यात 178 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 194 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात दिवसभरात 2 मृत्यूंची नोंद झाली आहे. पुण्यात सध्या 1887 सक्रिय रूग्ण आहेत.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा अहवाल ट्विट केला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊनही अद्यापही राज्यात काही निर्बंध लागू आहेत. मात्र रोजी रोटी कशी सुरू राहिल या पार्श्वभूमीवर सूटही देण्यात आली आहे. गणेश उत्सव आणि नवरात्र या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
ADVERTISEMENT