महाराष्ट्रात दिवसभरात 48 हजार 621 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दिवसभरात 59 हजार 500 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 567 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला राज्यात 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रूग्ण राज्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. रविवारी तुलनेने चाचण्या कमी होतात त्यामुळे रूग्णसंख्या कमी झालेली दिसते आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत झालेल्या 2 कोटी 78 लाख 64 हजार 426 चाचण्यांपैकी 47 लाख 71 हजार 22 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला 39 लाख 8 हजार 491 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 28 हजार 593 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
कुठल्या राज्यात लसींचा किती साठा, किती लसी गेल्या वाया?
आज राज्यात 48 हजार 621 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 47 लाख 71 हजार 22 इतकी झाली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या 567 मृत्यूंपैकी 283 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 146 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 138 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू ठाणे 49, औरंगाबाद 22, कोल्हापूर 17, नागपूर 8, अहमदनगर 7, जळगाव 7, रायगड 7, वाशिम 5, नांदेड 3, पुणे 3, सोलापूर 3, नाशिक 2, सांगली 2, बीड 1, पालघर 1 आणि परभणी 1 असे आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस वेळेत न मिळाल्यास काय करावे?
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णसंख्या
मुंबई- 59 हजार 970
ठाणे – 47 हजार 491
पालघर- 18 हजार 508
रायगड-12 हजार 169
पुणे-1 लाख 8 हजार 915
सातारा- 20 हजार 552
सांगली-14 हजार 742
कोल्हापूर -11 हजार 483
सोलापूर-20 हजार 497
नाशिक-51 हजार 195
अहमदनगर-23 हजार 145
जळगाव-12 हजार 592
औरंगाबाद-13 हजार 409
बीड -12 हजार 657
लातूर- 12 हजार 365
बुलढाणा-11 हजार 884
नागपूर- 70 हजार 186
भंडारा- 10 हजार 235
चंद्रपूर – 27 हजार 640
एकंदरीत अॅक्टिव्ह रूग्णांचा विचार केला तर पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक या ठिकाणी रूग्णसंख्या जास्त आहे. या पाच शहरांमध्ये अॅक्टिव्ह रूग्ण जास्त आहेत.
ADVERTISEMENT