महाराष्ट्रात दिवसभरात नवे 67 हजार 13 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 568 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 62 हजार 298 बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 81.34 टक्के झालं आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या 1.53 टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशातल्या कोरोना स्थितीचा घेणार आढावा, बंगाल दौरा रद्द
आजपर्यंत तपासण्यात 2 कोटी 48 लाख 95 हजार 986 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40 लाख 94 हजार 840 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 39 लाख 71 हजार 917 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 14 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 99 हजार 858 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात 67 हजार 13 नवीन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 40 लाख 94 हजार 840 इतकी झाली आहे.
‘ही’ आहेत कोव्हिड संवदेनशील राज्यं, महाराष्ट्र सरकारने केली यादी जाहीर
दिवसभरात नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 309 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 158 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 101 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू यवतमाळ 22, रायगड 16, नागपूर 13, नांदेड 9, नाशिक 8, औरंगाबाद 7, परभणी 5, सोलापूर 4, ठाणे 4, वर्धा 4, अहमदनगर 3, कोल्हापूर 2, जळगाव 1, नंदूरबार 1, पुणे 1 आणि सातारा 1 असे आहेत.
राज्यातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई- 82 हजार 616
ठाणे – 80 हजार 743
पालघर- 14 हजार 639
रायगड -13 हजार 928
पुणे – 1 लाख 17 हजार 337
सोलापूर- 13 हजार 587
नाशिक- 46 हजार 706
अहमदनगर- 22 हजार 23
जळगाव- 14 हजार 121
औरंगाबाद-13 हजार 520
बीड -12 हजार 588
लातूर- 16 हजार 732
परभणी- 14 हजार 259
नांदेड- 12 हजार 585
नागपूर- 80 हजार 924
भंडारा- 14 हजार 589
गोंदिया- 10 हजार 794
चंद्रपूर-18 हजार 388
ADVERTISEMENT