Devendra Fadnavis : पहिल्याच दिवशी 6 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे करार, CM फडणवीसांच्या नेतृत्वात नवा विक्रम

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या रकमेचे झालेले करार, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार असल्याची माहिती आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

22 Jan 2025 (अपडेटेड: 22 Jan 2025, 10:22 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोसमध्ये लाखो कोटींचे करार

point

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवा विक्रम

CM Devendra Fadnavis Daos Visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या दौऱ्यात अनेक कंपन्यांच्या भेटी घेतल्या असून, महाराष्ट्रात त्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. यामाध्यमातून महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एकटा टाटा समूह 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. तर दावोसमध्ये असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने एकूण  6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या रकमेचे झालेले करार, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा >>Kirit Somaiya : "अकोल्यात 15 हजार बांगलादेशींना जन्माचे दाखले देण्याचा घोटाळा", सोमय्यांचा दावा नेमका काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर आता टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.

 

हे ही वाचा >> Shirdi Robbery Video : दरोडा टाकून निघालेल्या दरोडेखोरांना नागरिकांनी दगड गोटे मारून रोखलं, थरारक VIDEO

रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात 15,000 मेवॉ पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली. शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले.
मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

    follow whatsapp