MPSC बाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार-आदित्य ठाकरे

मुस्तफा शेख

• 12:02 PM • 04 Jul 2021

MPSC परीक्षेत उतीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरूणाने आत्महत्या केली. या प्रकरणावरून सरकारवर टीकाही केली जाते आहे. या प्रश्नी कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात सगळ्याच विषयांवर चर्चा होणार […]

Mumbaitak
follow google news

MPSC परीक्षेत उतीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरूणाने आत्महत्या केली. या प्रकरणावरून सरकारवर टीकाही केली जाते आहे. या प्रश्नी कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात सगळ्याच विषयांवर चर्चा होणार आहे. असं सांगत एमपीएससीवरही चर्चा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?

झेव्हियर्सच्या मैदानाचं काम होत आलं आहे. त्यामुळे आता 90 मिमि पाऊस पडला तरीही पाणी तुंबणार नाही. पाऊस पडल्यावर काम थांबवावं लागतं आहे. अधिक क्षमतेच्या होल्डिंग टँक असल्या पाहिजेत. मुंबईत पाणी तुंबणारच नाही असं नाही पाऊस क्षमतेच्या बाहेर पडतो तेव्हा पाणी तुंबतं असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

MPSC परीक्षा पास झाल्यानंतरही नोकरी मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रात MPSC च्या विद्यार्थ्यांना भोगाव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. स्वप्नीलसारख्या हुशार मुलाच्या जाण्यामुळे लोणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या आईने एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी तोपर्यंत या सरकारला कळणार नाही अशा शब्दांत टाहो फोडला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे?

MPSC ला स्वायतत्ता दिली म्हणजे स्वैराचार नाही. परीक्षा उतीर्ण होऊन नोकरी न मिळाल्याने पुण्यात स्वप्नील लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करून द्यायाला हवं, मात्र परीक्षा झाल्यानंतर दोन-दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून आता तरूणाने आत्महत्या केली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं.

    follow whatsapp