किरीट सोमय्या यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन सोमवारीच नाकारला आहे. तर काही वेळापूर्वीच त्यांचा मुलगा नील सोमय्या याचाही अटकपूर्व जामीन कोर्टाने नाकारला आहे. नील सोमय्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा हा जामीन नाकारण्यात आला. विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी ५७ कोटींहून अधिक निधी जमा करण्यात आल्याचं हे प्रकरण आहे.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्यांनी हा निधी व्यक्तीगतरित्या वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एका माजी सैनिकाने तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर अटक टाळण्यासाठी सोमय्या पित्रा पुत्रांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने मात्र त्यांना दिलासा दिलेला नाही.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या दोघांवरही विक्रांतसाठी जमा केलेला ५७ कोटींहून अधिक निधी लाटल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. तो अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे आता नील सोमय्यांना जामीन मिळणार की नाही यावर उद्या निर्णय होणार आहे. सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत असंही सोमय्या यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
Kirit Somaiya INS Vikrant: किरीट सोमय्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
काय आहे प्रकरण?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत वाचवा म्हणत एक मोहीम राबवली होती. या मोहिमेत त्यांनी निधी गोळा केला होता. मात्र हा निधी राज्यपाल कार्यालयात पोहचला नाही. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली. राजभवनाने दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली. या प्रकरणी माजी सैनिक भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. किरीट सोमय्या त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार यांच्याविरूद्ध अर्ज केला. INS विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी कोट्यवधींचा आरोप सोमय्यांवर आहे.
‘सेव्ह विक्रांत’च्या नावावर गोळा केलेले ५७ कोटी कुठे गेले?; राऊतांचा सोमैय्यांवर गंभीर आरोप
काय आहेत संजय राऊत यांचे आरोप?
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली निधी गोळा केला होता. 57 ते 58 कोटी रुपये जमा झाले होते. मात्र, तो निधी राजभवनाकडे जमा केला गेलाच नाही, असं सांगत राऊतांनी सोमैय्यांच्या कंपनीत हा पैसा वापर गेलाय का? असा सवाल केला होता.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, ‘विक्रांत वाचवा म्हणून ते डबे फिरवायला लागले. त्या काळात त्यांना महाराष्ट्रातील लाखो करोडो लोकांनी पैसे दिले. माझ्या माहितीप्रमाणे किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले होते. ही रक्कम 57 ते 58 कोटी रुपये होती. मला हे त्यांच्याच एका जवळच्या माणसाने सांगितलं.’
‘महात्मा किरीट सोमय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. त्यांनी सरकारवर प्रचंड टीका करून, या सरकारमध्ये राष्ट्रीय भावना, देशभक्ती नाही, त्यामुळे आम्ही 200 कोटी रुपये गोळा करून ते राजभवनात जमा करू असं सांगितलं होतं’, असे आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.
ADVERTISEMENT