नील सोमय्यांची अटकेची भीती कायम! मुंबई न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

विद्या

• 11:47 AM • 01 Mar 2022

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी अटकेची शक्यता असल्याने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र त्यांना न्यायालयात दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश दीपक भागवत यांनी नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. किरीट सोमय्यांकडून झालेल्या आरोपांनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी अटकेची शक्यता असल्याने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र त्यांना न्यायालयात दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश दीपक भागवत यांनी नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

हे वाचलं का?

किरीट सोमय्यांकडून झालेल्या आरोपांनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मुलावरही पीएमसी बँक घोटाळा प्रकरण आणि पत्रा चाळ भूखंड घोटाळ्यासंबंधी आरोप केलेले आहेत.

यासंबंधातील कागदपत्र आर्थिक गुन्हे शाखेला आणि ईडीला देणार असल्याचं राऊत म्हणाले होते. दरम्यान, या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही.

मुलुंडच्या ‘त्या’ दलालाला जोड्याने मारू; संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले

राऊतांनी काय केलेले आहेत आरोप?

पालघरमधील वेवूर गावात त्यांचा (किरीट सोमय्या) एक फार मोठा प्रोजेक्ट सुरू आहे, २६० कोटी रुपयांचा. त्यांच्या मुलाच्या नावाने. त्यांच्या (किरीट सोमय्या) पत्नी मेधा सोमय्या या प्रकल्पाच्या संचालक आहेत. मी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे की, या २६० कोटींमध्ये ईडीचे एक संचालक आहेत, त्यांचे किती पैसे आहेत? ही बेनामी संपत्ती ईडीच्या एका संचालकाची आहे. मी जाहीरपणे विचारलं आहे. २६० कोटींच्या या प्रकल्पात किरीट सोमय्यांचा मुलगा नील किरीट सोमय्या आणि पत्नी मेधा किरीट सोमय्या. हे कोट्यवधी रुपये यांच्या येतात कुठून?” असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केलेला आहे.

देशातला सर्वात मोठा लफंगा आणि खंडणीखोर चोर म्हणजे किरीट सोमय्या-संजय राऊत

“वसईतील निकॉन प्रकल्पाची जमीन वाधवानकडून घेतलेली आहे. हा हजारो शेकडो कोटींचा भ्रष्टाचार आता रोज बाहेर काढणार. तुम्हाला (किरीट सोमय्या) उत्तर द्यावं लागेल आणि ईडीच्या कार्यालयात आम्ही हजारो लोकं जाणार आहोत. तुम्ही आमच्या पाच पंचवीस हजाराची चौकशी करता ना? आम्ही महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपये कसे लुटले गेले? कसा भ्रष्टाचार केला… आम्ही तुम्हाला उघडं केल्याशिवाय राहणार नाही”असं राऊत म्हणाले होते.

    follow whatsapp