– शिवशंकर तिवारी, मुंबई प्रतिनिधी
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनीट ८ ने MMDRA च्या प्रकल्पबाधित इमारतींमध्ये घर मिळवून देतो म्हणून सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गजाआड केलं आहे. बोगस लाईट बिल, आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटिंग कार्ड तयार करुन या टोळीने १५ ते २० लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.
क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर युनीट ८ च्या अधिकाऱ्यांनी चेंबूर परिसरात छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. शरद अडसुळे आणि राजेश मिश्रा अशी या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी घर मिळवून देतो सांगत किमान १५० पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केल्याचं कळतंय.
मुंबईत दुहेरी हत्याकांड, 89 वर्षीय वृद्धाने केली पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या
क्राईम ब्रांचने या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात बोगस लाईट बील, रेशन कार्ड, वोटींग कार्ड जप्त केले आहेत. कोणताही व्यक्ती जर तुम्हाला अशाप्रकारे घर मिळवून देण्याचं सांगत पैसे मागत असेल तर क्राईम ब्रांचला माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
‘ट्रकच्या मागे का लिहलं असतं Horn ok Please?
ADVERTISEMENT