मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मॉलच्या अंडग्राऊंडमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे मॉल आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मंगळवारी पूर्व उपनगरातील एका शॉपिंग मॉलच्या तळ मजल्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मॉलच्या तळघरात सकाळी एका कर्मचाऱ्याला एका 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर लगेचच या कर्मचाऱ्यानं वरिष्ठांना कळवलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Walmik Karad CCTV Video : खंडणी मागितली त्यादिवशी सगळे आरोपी एकत्र? CCTV ने उडवली खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, मॉलच्या तळघरात साचलेल्या पाण्यात मृतदेह तरंगताना आढळला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसंच, पोलीस महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी तपास करत आहेत. मात्र, अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. ओळख पटविण्यासाठी स्थानिक लोकांचीही मदत घेतली जात आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
