मुंबईतल्या डबेवाल्यांवर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कर्फ्यू लावण्यात आला आहे. अशात आता मुंबईतल्या डबेवाल्यांना आर्थिक चणचण जाणवू लागली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत एकूण 5 हजार डबेवाले आहेत. यातले 400-500 कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या नव्या निर्बंधांमध्ये फक्त 200 ते 250 डबेवालेच काम करत आहेत. सध्या आमच्यासमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे आम्हाला सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे असं डबेवाला संघटनेचे विष्णू काळढोके यांनी म्हटलं आहे.
Lockdown मुळे मुंबईच्या डबेवाल्यांवर मजुरी, हमाली करण्याची वेळ
मुंबईतला डबेवाला आणि त्यांचं मॅनेजमेंट हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र कोरोना, लॉकडाऊन यामुळे या मॅनेजमेंट गुरुंचं कंबरडं मोडून गेलं आहे. आर्थिक अडचणीत हे सगळेच आहेत. डबेवाले हे मुंभई शहरातील नोकरदारांचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत पोहचवण्याचं काम करतात.
डबेवाल्याचं हे काम अगदी सोपं वाटत असलं तरीही मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ते ज्या प्रकारे वेळेचं मॅनेजमेंट करतात. त्यामुळे मुंबईचे डबेवाले हे कायमच चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरले आहेत. याच डबेवाल्यांना आता आर्थिक चणचण भासू लागली आहे. डबेवाल्यांचं कौतुक जागतिक स्तरावरही झालं आहे. या डबेवाल्यांमुळेच अनेक गृहिणी जेवणाचा डबा कार्यालयात पाठवू शकतात. आज हाच मुंबईचा डबेवाला आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वर्क फ्रॉम होमवर जास्त भर देण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईतल्या डबेवाल्यांना बसला आहे. कार्यालयं, शाळा, कारखाने, बँका इथे डबे पोहचवण्याचा डबेवाल्यांचं काम सुरू आहे. मागचं वर्षभर हे काम कमी प्रमाणतच झालं आहे. अशात आता या डबेवाल्यांवर हमाली, रोजगार हमी योजनेची कामं, मजुरी किंवा लाकूड तोडण्याची वेळही आली आहे.
ADVERTISEMENT