Shah rukh Khan: आर्यन खानला जामीन मंजूर झाला तेव्हा शाहरुख ‘मन्नत’मध्ये नव्हता!

मुंबई तक

• 07:12 AM • 29 Oct 2021

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला आहे. 28 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर सुनावणी झाली. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश सांबरे यांनी आर्यनला जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानला जामीन मिळाल्याचं समजताच शाहरुख खानच्या कुटुंबात आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत आनंदाची लाट उसळली […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला आहे. 28 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर सुनावणी झाली. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश सांबरे यांनी आर्यनला जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानला जामीन मिळाल्याचं समजताच शाहरुख खानच्या कुटुंबात आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत आनंदाची लाट उसळली आहे.

हे वाचलं का?

शाहरुख खान ‘मन्नत’मध्ये नव्हता?

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर आता शाहरुख खानचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खान त्याच्या लीगल टीमसोबत दिसत आहे. त्यांच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील होती. हे फोटो समोर आल्यानंतर काही वेळातच शाहरुख खान आणि पूजा ददलानी हे मन्नतवर जाताना दिसले. यावरून असे समोर आले की, जेव्हा आर्यनला जामीन मंजूर झाला ही बातमी समोर आली तेव्हा हे दोघेही ‘मन्नत’वर नव्हते.

आर्यनच्या अटकेच्या दिवसापासून शाहरुख मीडियापासून होता दूर

आर्यन खानला जामीन मिळाल्याची बातमी आली तेव्हा शाहरुख खान मन्नतमध्ये नव्हता तर कुठे होता नेमका? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा आर्यनला अटक झाल्यापासून शाहरुख खान हा मन्नतवर नाही तर एका दुसऱ्याच ठिकाणी राहत होता. एवढंच नव्हे तर शाहरुख आपली स्वत:ची कार देखील वापरत नव्हता. तसंच या संपूर्ण प्रकरणात मीडियापासून पूर्णपणे दूरच होता.

‘मन्नत’वर नाही तर शाहरुख खान होता कुठे?

आर्यन खानला एनसीबीने 2 ऑक्टोबरला अटक केली होती. अशा स्थितीत मन्नतच्या घराबाहेर त्याला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांची दररोज गर्दी व्हायची आणि मीडियाची देखील बरीच गर्दी होती. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खानला कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी वाटत होती आणि या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी त्याने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तो त्याच्या बीएमडब्ल्यू कारऐवजी ह्युंदाई क्रेटा कार वापरत होता.

सलमान खानने घेतली होती भेट

यापूर्वी अशी बातमी आली होती की, शाहरुख खानने त्याच्या मित्र आणि हितचिंतकांना मन्नतमध्ये येण्यास मनाई केली होती. मन्नतच्या बाहेर जमा होणाऱ्या गर्दीमुळे त्याने हे केल्याचं समजतं आहे. दरम्यान, आर्यन खान तुरुंगात गेल्यानंतर सलमान खान हा शाहरुखला भेटण्यासाठी तीनदा मन्नतवर गेला होता. त्याच्याशिवाय फराह खान, महीप कपूर, अलविरा खान आणि करण जोहर यांनीही गौरी खानची भेट घेतली होती.

Aryan Khan Bail: पासपोर्ट सरेंडर, पुराव्याशी छेडछाड नको.. कोर्टाने आर्यन खानला कोणत्या अटींवर केला जामीन मंजूर?

आर्यन अजूनही घरी आलेला नाही

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला असला तरी तो अद्याप घरी परतलेला नाही. आर्यनच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या जामिनाची कागदपत्रे आज येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आर्यनला आज किंवा शनिवारी घरी परतता येईल. वकील मुकुल रोहतगी यांनीही सांगितले होते की, आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते या खटल्यासंदर्भात सतत वकिलांशी चर्चा करत होता.

    follow whatsapp