शाहरुख खानची मॅनेजर साक्षीदारांना करतेय प्रभावित, आर्यनला जामीन देऊ नका: NCB

विद्या

• 09:45 AM • 26 Oct 2021

मुंबई: बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यनचे वकील त्याला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे एनसीबीने आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध करत उत्तर दाखल केले आहे. शाहरुखच्या मॅनेजरविरोधात एनसीबीची याचिका या याचिकेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यनचे वकील त्याला जामीन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे एनसीबीने आर्यनच्या जामिनाला कडाडून विरोध करत उत्तर दाखल केले आहे.

हे वाचलं का?

शाहरुखच्या मॅनेजरविरोधात एनसीबीची याचिका

या याचिकेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचे नाव असून त्यात म्हटले आहे की, “अशा कथित प्रतिज्ञापत्रात मॅनेजर पूजा ददलानीचे नाव स्पष्टपणे नमूद केले आहे. या महिलेने (पूजा ददलानी) तपासादरम्यान साक्षीदारांवर प्रभाव टाकला. एनसीबीचे म्हणणे आहे की, साक्षीदारांना प्रभावित केलं जात आहे त्यामुळेच आर्यन खानचा जामीन फेटाळण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला जावा.

एनसीबीनंतर आर्यनच्या वकिलाने शपथपत्र केले दाखल

आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीने कोर्टात उत्तर दाखल केल्यानंतर आता आर्यनच्या लीगल टीमने देखील दोन पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, अर्जदाराचा सध्या सार्वजनिक/सोशल मीडियावर होत असलेल्या आरोप आणि प्रतिआरोपांशी काहीही संबंध नाही.

आर्यन खानचा प्रभाकर सईलशी कोणताही संबंध नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान आर्यन खानच्या कायदेशीर पथकाकडून प्रतिज्ञापत्रावर भर दिला जाणार आहे.

एनसीबीने रियाच्या प्रकरणाचा हवाला देत मांडली आपली बाजू

आर्यन खानच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीने सांगितले की, रियाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की, एनडीपीएस कायद्यांतर्गत सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत.

आर्यन खानने अनन्याकडून अरेंज केला गांजा, मित्रांना दाखवली NCB ची भीती? नवे What’s App चॅट समोर

शाहरुख-आर्यनच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर पोहोचलेले चाहते

दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानचे चाहते अभिनेत्यासोबत आर्यनचे पोस्टर घेऊन कोर्टाबाहेर पोहोचत आहेत आणि आर्यनला सोडण्याचे आवाहन करत आहेत.

‘आमच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या’

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही ड्रग्ज प्रकरणात गंभीर आरोप होत आहेत. अशा स्थितीत आता त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, आमच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. त्यामुळे मला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. समीर वानखेडे यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील त्यांच्या सध्याच्या पदावरून हटवल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो.

    follow whatsapp