Mumbai Corona : मुंबईत संसर्गाचा वेग मंदावला; दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख घसरला

मुंबई तक

• 01:41 PM • 29 Jan 2022

राज्यातील काही शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला, तरी राजधानी मुंबईत मात्र, संसर्ग आटोक्यात आल्याची दिलासादायक परिस्थिती आहे. गेला आठवडाभरापासून मुंबईत दररोज रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवली जात असून, मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या १,५०० पेक्षाही कमी आहे. तर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा दुप्पट आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील काही शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असला, तरी राजधानी मुंबईत मात्र, संसर्ग आटोक्यात आल्याची दिलासादायक परिस्थिती आहे. गेला आठवडाभरापासून मुंबईत दररोज रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवली जात असून, मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या १,५०० पेक्षाही कमी आहे. तर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा दुप्पट आहे.

हे वाचलं का?

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत मुंबईत १,४११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आढळून आलेल्या रुग्णांपैकी लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या १,२२७ म्हणजे ८७ टक्के इतकी आहे. आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी १८७ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, ४३ जणांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईत एकूण बेड्स ३७,५७७ असून, त्यापैकी २,४३४ बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत मुंबईत ३ हजार ५४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या १२,१८७ इतकी असून, मुंबईत मागील २४ तासांत ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईतील एकूण मृतांची संख्या १६,६०२ वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत १०,१२९२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. आज कमी प्रमाणात रुग्ण आढळून आल्यानं मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा कालावधीही ३२२ दिवसांवर गेला. मुंबईचा साप्ताहिक पॉझिटिव्ही रेट ०.२१ टक्के इतका आहे.

मुंबईत सध्या एकही सक्रीय कंटेनमेंट झोन नसून, सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या २० वरून १३ वर आली आहे. तसेच मागील २४ तासांच्या कालावधीत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६,१३५ जणांचा शोध घेण्यात आला आहे.

मागील १० दहा दिवसांत आढळलेले रुग्ण (कंसात चाचण्या)

२० जानेवारी – ५,७०८ (५३,२०३)

२१ जानेवारी – ५,००८ (५०,०३२)

२२ जानेवारी – ३,५६८ (४९,८९५)

२३ जानेवारी – २,५५० (४५,९९३)

२४ जानेवारी – १,८५७ (३४,३०१)

२५ जानेवारी – १,८१५ (३४,४२७)

२६ जानेवारी – १,८५८ (४२,३१५)

२७ जानेवारी – १,३८४ (४२,५७०)

२८ जानेवारी – १,३१२ (२७,७२०)

२९ जानेवारी – १,४११ (३८,,९६५)

    follow whatsapp