आज महाविकास आघाडीकडून मुंबईत आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळसाहेब ठाकरे या पक्षातील कार्यकर्ते आणि नेते शामिल झाले आहेत. मुंबईत मोठ्यासंख्येत कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी पोलीस मोठ्या संख्येत तैनात करण्यात आले आहे. महत्वाचं म्हणजे खुद्द पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा असताना सुद्धा ते बंदोबस्तात स्व:ता हजर आहेत. मुलीचं लग्न असताना सुद्धा त्यांनी ड्यूटीला प्रधान्य दिल्याने त्यांचं कौतुक होत आहे.
ADVERTISEMENT
कायदा आणि सुव्यावस्थेकडे विशेष लक्ष
शनिवारचा दिवस मुंबईकरांसाठी आंदोलन आणि मोर्चांचा दिवस ठरणार आहे. आज महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर त्याचवेळी भाजपकडूनही माफी मांगो आंदोनल करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी स्व:ता रस्त्यावर उतरुन चोख बंदोबस्तासाठी स्व:ता पुढाकार घेतला. त्यात त्यांच्या मुलीचं लग्न आजच आहे. अशा परिस्थित त्यांनी मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था कशी अबाधीत राहिल याकडे लक्ष दिलं.
सहा महिन्यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी
विवेक फणसाळकर यांनी सहा महिने आगोदर मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा आपल्या हाती घेतली. पोलीस आयुक्त संजय पांड्ये यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या एकूणच वादग्रस्त कारकिर्दीनंतर मुंबई पोलीस आयुक्ताकडे सर्वांचेच विशेष लक्ष आहे.
विवेक फणसाळकर यांची कारकिर्द
१९९१-९३: अकोला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले.
१९९३-९५: राज्यपाल डॉ.पी.सी. अलेक्झांडर यांचे एडीसी होते.
1995-98: वर्धा आणि परभणी येथे पोलीस अधीक्षक.
1998-2000: पोलिस उपायुक्त, नाशिक.
2000-03: पोलीस अधीक्षक, सीआयडी (गुन्हे), नागपूर.
2003-07:- दक्षता संचालक, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
2007-10: पुणे आणि ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त.
2010-14: सह पोलिस आयुक्त (वाहतूक), मुंबई.
2014-15: पोलिस सहआयुक्त (प्रशासन)
2015-16: अतिरिक्त पोलिस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई.
2016-18: अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई.
2018-22 : ठाणे पोलीस आयुक्त
जुन 2022 पासून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत
ADVERTISEMENT