मुंबईतील आणखी एका डान्सबारचा पर्दाफाश; लपवलेल्या १८ बारबालांना घेतलं ताब्यात

मुंबई तक

• 12:18 PM • 06 Mar 2022

काही महिन्यांपूर्वी अंधेरीत सुरू असलेलं छमछम बंद केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेनं आणखी एक मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील अंबोली परिसरात असलेल्या सदानंद (स्टार इन) डान्स बारवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बारमधील एका खोलीत लपवलेल्या तब्बल १८ बारबालांना ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबईतली अंबोली परिसरात सदानंद (स्टार इन) डान्स बार सुरू असल्याची माहिती […]

Mumbaitak
follow google news

काही महिन्यांपूर्वी अंधेरीत सुरू असलेलं छमछम बंद केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेनं आणखी एक मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील अंबोली परिसरात असलेल्या सदानंद (स्टार इन) डान्स बारवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बारमधील एका खोलीत लपवलेल्या तब्बल १८ बारबालांना ताब्यात घेतलं.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबईतली अंबोली परिसरात सदानंद (स्टार इन) डान्स बार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेच्या पथकाने अंबोली परिसरात असलेल्या या डान्सबारवर धाड टाकली. शनिवारी रात्री पथकाने ही कारवाई करण्यात आली.

नागपूर : पोलिसांची धाड पडताच ‘डान्स’बार बंद ‘गझल’ सुरू, तरीही बिंग फुटलंच

सामाजिक सेवा शाखेची धाड पडल्यानंतर डान्स बारमधील बारबालांना एका खोलीत लपवण्यात आलं होतं. डान्स बारची झाडाझडती घेताना पथकाला डान्स बारमधील खोलीतून १८ बारबाला लपून बसल्याचं आढळून आलं. त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

त्याचबरोबर पथकाने बारचालक, बार मॅनेजर, एका बारमॅनला, ८ वेटर्स, २ ऑर्केस्ट्रा कलाकार आणि १६ कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ७७ हजार ४३० रुपये रोख रकमेसह १ एम्प्लिफायर, १ लॅपटॉप, १ स्पीकर आणि १ मेमरी कार्ड असं साहित्य जप्त केलं.

अंधेरीतील दीपा बारचा अखेर पर्दाफाश; 17 बारबालांना लपवलं होतं भिंतीतील भुयारात

अंबोली परिसरातील सदानंद डान्स बारवरील कारवाई सामाजिक सेवा शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कानवाडे आणि त्यांच्या पथकाने केली.

    follow whatsapp